Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऑपरेशन टायगर’साठी ठेकेदाराचे 600 कोटी; ठाकरे गटाचे माजी खासदार खैरे नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर खासदारांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्यात शिवसेना मजबूत केली. येथून तीन-तीन खासदार निवडून आले. त्यांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रचार केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 19, 2026 | 09:23 AM
'ऑपरेशन टायगर 'साठी ठेकेदाराचे ६०० कोटी?; खैरेंच्या आरोपाने राजकारणात खळबळ

'ऑपरेशन टायगर 'साठी ठेकेदाराचे ६०० कोटी?; खैरेंच्या आरोपाने राजकारणात खळबळ

Follow Us
Follow Us:

मुंबई : ‘ऑपरेशन टायगर’वरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरून मोठा आरोप केला आहे. मराठवाड्यातील एका ठेकेदाराला उद्धव ठाकरे गट फोडण्यासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, हा विषय सध्या कायदेशीर गुंतागुंतीत अडकल्याने ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांनी इशारा देताना सांगितले की, गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. तसेच संबंधित सहा खासदारांविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी पक्षाशी निष्ठा राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “जे गद्दार होते ते आता पक्षातून निघून गेले आहेत. त्यामुळे पक्षात पुन्हा फूट पडणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी आहोत आणि दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देऊ”.

‘गद्दारांना Y+ सुरक्षा, शेतकऱ्यांना अटी,’ खासदार फुटीवरून मविआ आक्रमक; रोहित पवार, वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल

दरम्यान, खैरे यांनी बंडखोर खासदारांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्यात शिवसेना मजबूत केली. येथून तीन-तीन खासदार निवडून आले. त्यांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रचार केला. मात्र, त्याच लोकांनी उद्धव साहेबांचाच अपमान केला. कुणी आई-वडिलांची शपथ घेतली, तर कुणी साईबाबांची शपथ घेतली; पण आता त्यांच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवायचा? जे उद्धव ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत, ते दुसऱ्यांचे काय होणार? ते भविष्यात त्यांनाही धोका देतील. हा सगळा पैशांचा खेळ आहे. पक्षात फूट पडणार असून, सहा जण जाणार असल्याची माहिती मला महिनाभरापूर्वीच मिळाली होती, असा दावा त्यांनी केला.

…हे कृत्रिम आणि खोटे बळ

खैरे पुढे म्हणाले की, सतत पक्षफोड करून राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यातून कोणताही खरा फायदा होणार नाही. हे कृत्रिम आणि खोटे बळ आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे. आम्ही सर्वजण अत्यंत नाराज आहोत. १९९१ मध्ये छगन भुजबळ १५ आमदारांना सोबत घेऊन वेगळे झाले होते, तेव्हाही आम्हाला मोठे दुःख झाले होते. आजही तसाच अनुभव येत आहे. मात्र, शिवसैनिकांनी नेहमी संघर्ष केला आहे आणि पुढेही करत राहतील, असे त्यांनी सांगितले.

Operation Tiger : ‘उद्धव ठाकरेंवरुन खासदारांचा विश्वास उडाला’; शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागत करू – मिलिंद देवरा

Web Title: Contractor 600 crores for operation tiger says chandrakant khaire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • Chandrakant Khaire
  • Maharashtra Politics
  • Operation Tiger
  • political news

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.