• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Dcm Ajit Pawar Marathi News Gives Planning On Pune Growth Hub

पुणे महानगर क्षेत्र होणार ग्रोथ हब…; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला नीती आयोगाचा ‘मास्टरप्लॅन’

नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय बैठक घेतली. मंत्रालयामध्ये बैठक घेतलेल्या अजित पवार यांनी पुणे ग्रोथ हब होणार असल्याचे जाहीर केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 24, 2025 | 04:53 PM
ajit pawar marathi news gives planning on Pune Growth Hub

अजित पवार यांनी मंत्रालयामध्ये बैठक घेत पुणे ग्रोथ हब होणार असल्याचे सांगितले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात भारतासाठी 14 ग्रोथ हब शहरांच्या विकासाची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (महाराष्ट्र), सुरत (गुजरात), वायझॅग (आंध्र प्रदेश) आणि वाराणसी (उत्तर प्रदेश) या चार शहरी क्षेत्रात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये ग्रोथ हब (G-HUB) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली असून आता पुणे महानगर प्रदेश क्षेत्र ग्रोथ हब (G-HUB) म्हणून विकसित करण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यानुसार नीती आयोगाने महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नाशिकचा समावेश केला आहे. पुण्यामध्ये आयटी कंपन्या, कारखाने, मेट्रो, रिंग रोड, औद्योगिक कॉरिडोर्स आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, रुग्णालये असल्याने ग्रोथ हब बनण्यासाठी पुणे महानगर प्रदेश आघाडीवर आहे. पुण्यात अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था यशदा ही पुणे महानगर प्रदेश क्षेत्रासाठी आर्थिक वाढीचे धोरण आणि नियोजन आराखडा तयार करणार असून कामाबाबतचे निरीक्षण आणि समन्वय विभागीय आयुक्त करणार आहेत. यशदाचा आराखडा तयार झाल्यानंतर मनपा, पीएमआरडीए यांच्यासह संबंधित यंत्रणेने कामाबाबत अंमलबजावणी करावी, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, पुण्याचे सकल उत्पन्न ४.२ लाख कोटी असून २०३० पर्यंत १५ ते १८ लाख नोकऱ्या तयार होणार आहेत. यामध्ये किमान ६ लाख महिला कामगार असतील, असे नियोजन करण्यात येणार असल्याने देशात सर्वात प्रथम आर्थिक विकास आराखडा स्वीकारणाऱ्या शहरात पुणे असेल, यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह पुण्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सुरू असलेल्या विविध प्रकल्पातील कामात सातत्य ठेवावे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कामाच्या प्रगतीसाठी पुण्यामध्य यशदा येथे लवकरच सर्व संबंधित यंत्रणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ग्रोथ हबसाठी आवश्यक प्रमुख विकास घटक

पुण्यात माहिती तंत्रज्ञान, एआय, इलेक्ट्रिक वाहन, क्लीन टेक, सेमीकंडक्टर डिझाईन उपलब्ध आहेत. शिवाय एमआयडीसी क्षेत्रांमध्ये (चाकण, तळेगाव, रांजणगाव इ.) ऑटोमोटिव्ह, एअरोस्पेस, प्रिसीजन इंजिनीयरिंग आणि फार्मा क्लस्टरचा विस्तार होत आहे. आठशेहून अधिक उच्च शिक्षण संस्थांचा लाभ घेऊन भारताचे टॉप विकसित कौशल्य घेणाऱ्यांची सेवा पुरविणारे स्किलिंग-एक्सपोर्ट शहर होणार आहे. मेट्रो व रिंग रोड कॉरिडोरसह नवीन टाउनशिप असल्याने हरित आणि स्मार्ट नागरिकरणास पोषक वातावरण आहे. पुण्यात पर्यटनासाठी वाव असल्याने पर्यटन, कृषी पर्यटन, आध्यात्मिक सर्किट, अ‍ॅडव्हेंचर झोन्ससाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाय कौशल्य प्रमाणपत्र, स्टार्टअप गुंतवणुकीसाठी व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याने परदेशी गुंतवणुकीतही वाढ होणार आहे.

Web Title: Dcm ajit pawar marathi news gives planning on pune growth hub

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • ajit pawar
  • political news
  • pune news

संबंधित बातम्या

स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे बिगूल वाजले; अजित पवार स्वतः ऐकून घेणार नागरिकांच्या तक्रारी
1

स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे बिगूल वाजले; अजित पवार स्वतः ऐकून घेणार नागरिकांच्या तक्रारी

प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता पूर्ण; आता बदलाकडे लागले सर्वांचे लक्ष
2

प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता पूर्ण; आता बदलाकडे लागले सर्वांचे लक्ष

Pune Rain News: विश्रांती संपली! पुण्यात ‘कोसळधार’; अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
3

Pune Rain News: विश्रांती संपली! पुण्यात ‘कोसळधार’; अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ

बांके बिहारी मंदिरातील भाविकांना मिळाला न्याय; यापुढे VIP पास घेऊन जाल तर व्हाल बाहेर
4

बांके बिहारी मंदिरातील भाविकांना मिळाला न्याय; यापुढे VIP पास घेऊन जाल तर व्हाल बाहेर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दशावतार पहिल्याच दिवशी ‘आरपार”! बॉक्स ऑफिसवर तब्बल ६५ लाखांची कमाई

दशावतार पहिल्याच दिवशी ‘आरपार”! बॉक्स ऑफिसवर तब्बल ६५ लाखांची कमाई

शासकीय कर्मचाऱ्यांनो, कार्यालयात ओळखपत्र लावूनच फिरा; अन्यथा होणार कारवाई

शासकीय कर्मचाऱ्यांनो, कार्यालयात ओळखपत्र लावूनच फिरा; अन्यथा होणार कारवाई

दुचाकीवरुन घरी जाताना डम्परने विद्यार्थिनीला उडवले; ग्रामस्थांनी वाहन चालकासह मुरुम माफियाला दिला चोप

दुचाकीवरुन घरी जाताना डम्परने विद्यार्थिनीला उडवले; ग्रामस्थांनी वाहन चालकासह मुरुम माफियाला दिला चोप

High Court News: संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही ; उच्च न्यायालयाची टिपण्णी

High Court News: संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही ; उच्च न्यायालयाची टिपण्णी

Diella : भ्रष्टाचाराविरुद्ध डिजिटल शस्त्र! ‘या’ देशाच्या सरकारने नियुक्त केली जगातील पहिली AI मंत्री, पहा VIDEO

Diella : भ्रष्टाचाराविरुद्ध डिजिटल शस्त्र! ‘या’ देशाच्या सरकारने नियुक्त केली जगातील पहिली AI मंत्री, पहा VIDEO

Ratnagiri News : लोकशाहीची गळचेपी केली तर…. ; जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन

Ratnagiri News : लोकशाहीची गळचेपी केली तर…. ; जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन

India vs Pakistan Asia Cup 2025: “भारत पाकिस्तान सामना देशभक्तीची थट्टा, देशभक्तीचा व्यापार सुरू”, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

India vs Pakistan Asia Cup 2025: “भारत पाकिस्तान सामना देशभक्तीची थट्टा, देशभक्तीचा व्यापार सुरू”, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Nashik News : 40 किमी प्रवासाला दोन तास, रस्ता चौपदरीकरणाची गरज अधोरेखित

Nashik News : 40 किमी प्रवासाला दोन तास, रस्ता चौपदरीकरणाची गरज अधोरेखित

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Parbhani Crime : परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक

Parbhani Crime : परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक

Kolhapur : कोल्हापूरात कुणबी नोंदीतील चुका उघड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप

Kolhapur : कोल्हापूरात कुणबी नोंदीतील चुका उघड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप

Navi Mumbai :  मनपा अधिकारी सत्ताधाऱ्यांना हवी तशीच प्रभाग रचना करत आहेत, मनसेचा आरोप

Navi Mumbai : मनपा अधिकारी सत्ताधाऱ्यांना हवी तशीच प्रभाग रचना करत आहेत, मनसेचा आरोप

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.