
Devendra Fadnavis, Maharashtra Politics, BJP, Delhi Politics, Maharashtra News,
“माझा पक्ष आणि माझे नेते ठरवतील त्या दिवशी मी नक्की दिल्लीला जाईल . पण आज तरी मला वाटतं मी २०२९ पर्यंत दिल्लीला जाणार नाही,” अशी प्रतिक्रीया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.खूप लोकांच्या वेगवेगळ्या भावना आहेत. त्यात माझे काही हितचिंतकही आहेत. त्यांना वाटतं जर मी दिल्लीला गेलो, माझं प्रमोशन होईल असं काहींना वाटतं. तर मी दिल्लीला गेलो तर बला टळेल, आपल्या डोक्यावर राहणार नाही, असंही काहींना वाटतं. पण कोणाला चांगलं वाटो अथवा वाईट वाटो, २०२९ पर्यंत तरी माझ् नेते मला महाराष्ट्रात ठेवतील, हे मी तुम्हाला आजच सांगतो. माझे नेते मला महाराष्ट्रात ठेवतील,मला राजकारण कळतं, माझा पक्ष कळतो. पण दर दोन तीन महिन्यांनी कोणाही काही मिळालं नाही की ते मला दिल्लीला पाठवतात, कधी कोणाला न्यूज क्रिएट करायची असेल तर ते मला दिल्ली पाठवतात, त्याचा आनंद आहे. पण माझा पक्ष आणि नेते ठरवतील त्या दिवशी मी नक्की दिल्लीला जाईन. पण आज तरी मी २०२९ पर्यंत दिल्लीत जाणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी राज्य सरकारकडून विकासाचा वेग आणखी वाढवण्यावर भर दिला जात आहे. सध्या महाराष्ट्राचा विकासदर 8.8 टक्के असून, हा दर 10 टक्क्यांहून अधिक नेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
‘माझा इन्फ्रा व्हिजन’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्याच्या आर्थिक विकासाचा रोडमॅप मांडताना म्हणाले की, महाराष्ट्र हे 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवणाऱ्या देशातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. अनेक राज्ये 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, महाराष्ट्र राज्य सध्या या लक्ष्याच्या सर्वाधिक जवळ आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुमारे 660 अब्ज डॉलरवर पोहोचली असल्याने महाराष्ट्र हे 1 ट्रिलियन डॉलरच्या लक्ष्याच्या अगदी जवळ आहे.
सध्या राज्याचा विकासदर 8.8 टक्के आहे. मात्र, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी विकासदरात आणखी वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण शाश्वत विकासदर कायम ठेवला, तर 2030 मध्ये महाराष्ट्र निश्चितपणे 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्याच्या आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा हा महत्त्वाचा आधार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. रस्ते, महामार्ग, मेट्रो, विमानतळ, औद्योगिक प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण विकासदर राखणे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आवश्यक आहे. या माध्यमातून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.