Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना खालापूर येथे पोलिसांनी अटक केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अटकेनंतर घारे यांना अलिबाग येथे नेण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या कारवाईमुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 02, 2026 | 06:15 PM
महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Follow Us
Follow Us:
  • महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक
  • खालापूर येथे अटक आणि अलिबाग येथे नेल्याने कार्यकर्ते संतप्त
  • महाएल्गार आंदोलनाआधी पोलिसांची कारवाई
कर्जत: खालापूर तालुक्यातील टाटा स्टील आणि गोदरेज या कंपनीच्या विरोधात नियोजित महाएल्गार मोर्चाचे पार्श्वभूमीवर आज चर्चेसाठी खालापूर पोलीस ठाण्यात बसलेले मोर्चाचे नेतृत्व करणारे सुधाकर घारे (Sudhakar Ghare Arrest) यांना खालापूर येथे अटक करण्यात आली.खालापूर पोलिसांनी अटक करून घारे यांना अलिबाग येथे नेले असल्याचे सांगितले जात असून या प्रकाराने कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले आहे.

खालापूर येथील गोदरेज आणि टाटा स्टील कंपनीच्या गेट वर उद्या 3 सप्टेंबर रोजी महाएल्गार आंदोलन होणार आहे.घारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या एल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे आज खालापूर पोलिस ठाण्यात चर्चेसाठी गेले होते.भूमिपुत्रांना स्थानिक उद्योगांमध्ये ८० टक्के रोजगार, स्थानिकांना ठेकेदारीत प्राधान्य तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर टाटा स्टील व गोदरेज कंपन्यांसमोर उद्या एल्गार आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

पोलीस बंदोबस्त तैनात

या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली.तेथे प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अलिबाग येथे नेण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.आंदोलनापूर्वी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत.

सुधाकर घारे यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान,पोलिसांनी ही कारवाई पूर्णपणे प्रतिबंधात्मक स्वरूपाची असल्याचे सांगितले असून शांततेत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

पाठिंबा देणाऱ्यांना नोटिसा..

खालापूर येथे होणाऱ्या महाएल्गार मोर्चा साठी पाठिंबा अनेक संस्थांनी दिला आहे.दुसरीकडे याच पाठिंबा देणाऱ्या संस्था आणि राजकीय पक्ष यांना खालापूर पोलीस यांच्याकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत.खालापूर पोलीस कर्जत तालुक्यात त्या त्या संस्था,राजकीय पक्ष यांना गाठून नोटीस बजावली जात आहे.त्यामुळे देखील कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे.

GI मानांकन मिळूनही कोरेगावचा घेवडा पीक विम्यापासून वंचित! अमित भोईटेंची कृषी उपसंचालकांकडे ‘ही’ मागणी

Web Title: Sudhakar ghare arrested at khalapur before mahaelgar agitation workers angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • raigad
  • Sudhakar Ghare

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
1

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण
2

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
3

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
4

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.