Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरकारचा हस्तक्षेप नाही’; मनोज जरांगे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

मराठवाड्यातील चार महिला लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा जात पडताळणी प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Aug 06, 2026 | 04:33 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • जात पडताळणी समिती स्वतंत्रपणे काम करत असल्याचा फडणवीसांचा दावा.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसारच प्रमाणपत्रांची पडताळणी.
  • अन्याय झाल्याची भावना असल्यास अपील करण्याचा सल्ला.
 

मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या चार मराठा महिला लोकप्रतिनिधींची जात पडताळणी समितीने प्रमाणपत्रे रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयानंतर मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, जात पडताळणी समितीचे संपूर्ण कामकाज सर्वोच्च न्यायालयाने निश्चित करून दिलेल्या नियमांच्या चौकटीत चालते. त्यामुळे या प्रक्रियेत राज्य सरकार किंवा कोणत्याही मंत्र्याचा हस्तक्षेप होत नाही. “मनोज जरांगे पाटील नेमके काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मात्र जात पडताळणी समिती स्वतंत्रपणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच निर्णय घेते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कुणबी प्रमाणपत्रे किती रद्द झाली याची अचूक माहिती नाही

कुणबी प्रमाणपत्रे किती रद्द झाली याची अचूक माहिती सध्या नसल्याचे सांगताना फडणवीस यांनी जात पडताळणी प्रक्रियेतील नकाराच्या प्रमाणाबाबतही माहिती दिली. त्यांच्या मते, विविध प्रकारच्या जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीत साधारण १० ते १२ टक्के अर्ज नाकारले जातात. काही प्रकरणांमध्ये हे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंतही पोहोचते. त्यामुळे केवळ कुणबी प्रमाणपत्रांनाच लक्ष्य केले जात असल्याचा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सूचित केले.

Manoj Jarange Patil: ‘तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका’; फडणवीस-शिंदे-बावनकुळे-विखेंवर जरांगेंचा हल्लाबोल

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, एखाद्या अर्जदाराला निर्णय अन्यायकारक वाटत असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. संबंधित व्यक्ती अपील करू शकते आणि समितीने नमूद केलेल्या त्रुटींची पूर्तता करून पुन्हा प्रक्रिया पूर्ण करता येते. आवश्यक वाटल्यास वरिष्ठ अधिकारीही प्रक्रियेची पडताळणी करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या दबावाखाली निर्णय नाही

राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, भाजपच्या अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांचीही जात वैधता प्रमाणपत्रे यापूर्वी रद्द झाली आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या दबावाखाली निर्णय घेतले जातात, असा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘माझी नार्को टेस्ट करा,’ मनोज जरांगे यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत काही महिला लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, या प्रकरणात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Devendra fadnavis reaction on manoj jarange kunbi certificate maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
1

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
2

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
3

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा
4

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.