Political News: माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. लालबाग-परळमधील या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.
Mumbai Political News: अनेक वर्षे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाणारे अशोक मिश्रा यांनी अखेर यूबीटी शिवसेनेला रामराम ठोकला. शेकडो समर्थकांसह ते वर्षा बंगल्यावर पोहोचले.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकी साठी भारतीय जनता पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत असून, नगरसेवक पदासाठी १२๐० पेक्षा अधिक इच्छुकांनी भाजपकडून अर्ज घेतले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. अशातच आता आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार आहेत.
अहिल्यानगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका एकवीस वर्षीय विवाहित महिलेने गुन्हा दाखल केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात…
संजय शिरसाट प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. "शिरसाट यांच्या बॅगेतून पैसे सापडणे ही काही पहिली वेळ नाही," असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर…
महाड शहरात ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदी सक्तीविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्रिभाषा सूत्री कार्यक्रमांतर्गत हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी करत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या विरोधात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले आहेत. पालिकेच्या निर्णयाने नाराजी व्यक्त केली जात असून या घनकचरा शुल्क वाढीचा विरोध करण्यात येत आहे.
विरोधकांच्या आक्षेपांकडे गांभीर्याने पाहावं, आणि निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. अमित शाह मुंबईवर कब्जा मिळवू पाहत असल्याचा आरोप केला.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. नुकतेच ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवली भागात पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्याचे खूप हाल होतात. पावसाळ्यापूर्वीच यावर उपाययोजेबाबत बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाला आश्वासन दिले