Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde Marathi Speech:मराठी ही सक्तीची नव्हे भक्तीची भाषा; एकनाथ शिंदेंचे विधान

Eknath Shinde : शिवसेनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या १०५ दिवसांच्या अभियानात १.२५ लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षा उत्तीर्ण केली हे अभियान केवळ समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 18, 2026 | 12:27 PM
Eknath Shinde Marathi Speech, Balasaheb Thackeray Marathi Bhasha Abhiyan

Eknath Shinde Marathi Speech, Balasaheb Thackeray Marathi Bhasha Abhiyan

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता सोहळा पार पडला.
  • १०५ दिवसांच्या या विशेष अभियानात तब्बल १.२५ लाख अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली.
  • मराठी भाषा कायद्याच्या बडग्याने सक्तीने लादण्यापेक्षा प्रेमाने व भक्तीने शिकवणे अधिक प्रभावी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
Eknath Shinde Marathi Speech: “महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे; कायद्याचा बडगा दाखवून नव्हे, तर प्रेमाने भाषा शिकवता येते. मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा असून अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद आहे. अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियाना’च्या सांगता समारंभात शिंदे बोलत होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासह विविध अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात गेल्या काही वर्षांपासून मराठी-अमराठी वाद सातत्याने चर्चेत असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा मुंबईसह राज्यातीस सर्व अमराठी रिक्षाचालक आणि इतर नागरिकांना मराठी बोलता आलं पाहिजे, अशी आग्रही मागणी करत आहेत. यावरून अनेकदा मुंबईत राजकारणही तापलेलं असते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या सुरूवातीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

 

Marathi language: चालकांना मराठी ज्ञान अनिवार्य, अन्यथा…; १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांचा मराठी संवाद पाठ्यक्रमात

१.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी परीक्षा उत्तीर्ण

एकनाथ शिंदे म्हणाले की, ” शिवसेनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या १०५ दिवसांच्या अभियानात १.२५ लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षा उत्तीर्ण केली हे अभियान केवळ समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे आव्हान स्वीकारले. त्यांनी कायद्याचा धाक न दाखवता प्रेमाने मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न केले. जे कायद्याने होऊ शकत नाही, ते प्रेमाने होऊ शकते,” असे सांगत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. दरम्यान, मराठी शिकण्यासाठी अद्यापही काही रिक्षाचालकांकडून सोशल मीडियावर विरोध व्यक्त केला जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

 

Dimagi Naxal Party Instagram Trend: पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ विधानाचे सोशल मीडियाव

सरनाईक म्हणाले की, “मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षाचालकांना आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात येईल. त्यानंतरही मराठी बोलता आली नाही, तर रिक्षाचालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला. तसेच, आतापर्यंत १ लाख ६५ हजार रिक्षाचालकांनी मराठी शिकण्यासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ४० हजार अमराठी रिक्षाचालकांनी प्रशिक्षण घेतल्याचेही सरनाईक यांनी नमुद केले.

‘रिक्षाचालक साहित्यिकांसारखा मराठी बोलेल’

उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले की, “रिक्षा-टॅक्सी चालकांनी केवळ व्यवहारापुरती मराठी न बोलता साहित्यिकांसारखी समृद्ध मराठी बोलावी, यासाठी पुढील उपक्रम राबवला जाईल. मराठी भाषा शिकल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज दिसत दिसते.

Web Title: Eknath shinde speech at balasaheb thackeray marathi bhasha abhiyan thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन
1

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन

Ishqa Ishqa Trailer:  प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज
2

Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
3

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Dombivli News : रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत डोंबिवलीत नांदी संमेलन; AIपासून मराठी भाषेपर्यंत चर्चा
4

Dombivli News : रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत डोंबिवलीत नांदी संमेलन; AIपासून मराठी भाषेपर्यंत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.