Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीमध्ये 2 नंबर कोण? रवींद्र चव्हाण म्हणाले “त्याला काहीच किंमत नाही”; शिंदेंना लगावला टोला?

विटामध्ये रवींद्र चव्हाण यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी आर आर पाटील यांच्या विजयी भाषणाची आठवण काढली. तसेच यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 30, 2025 | 12:24 PM
पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने

पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने

Follow Us
Follow Us:
  • महायुतीमध्ये अंतर्गत वाद समोर येत आहे
  • एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज
  • भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची टीका
Ravindra Chavan : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. नगर पंचायत आणि नगर परिषदांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे आजचा दिवस हा प्रचारा धुराळा उडाला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे अनेक नेते हे भाजपचे कमळ हाती घेत असल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज आहेत. या संदर्भात त्यांनी दिल्ली वारी करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. यावरुन वाद पेटलेला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीबाबत अनेकदा सूचक वक्तव्य करत आहेत.

भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेकदा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सूचक वक्तव्य केली. यानंतर त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. भाजपच्या इतर नेत्यांनी हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांनी दोन नंबरला काहीही महत्त्व नाही असे म्हटले आहे. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

महायुती तुटण्याच्या मार्गावर? रामदास आठवलेंच्या ‘त्या’ विधानाने चर्चेला उधाण

विटामध्ये रवींद्र चव्हाण यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी आर आर पाटील यांच्या विजयी भाषणाची आठवण काढली. 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर आर. आर. पाटील यांनी विधानसभेत भाषण केले होते. ते भाषण अत्यंत गाजले. या भाषणाचा उल्लेख करत रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले की, ‘मी काँग्रेस, राष्ट्रवादी या आघडीत बरीच वर्ष काम केले. मोठी पदं भुषवली. मी नंबर एक होण्याचा प्रयत्न केला. पण नंबर एक होऊ शकलो नाही. तर नंबर दोनच राहिलो. बाबांनो, नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोन याला काही किंमत नसते. रवींद्र चव्हाण यांनी नेमक्या याच ओळींची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. आणि महायुतीमध्ये भाजपचं मोठा भाऊ असल्याचे ठणकावून सांगितले.

Maharashtra Politics : नवनीत राणांचा पराभव नेमका का झाला? रवी राणांनी थेट केला खुलासा

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले हे माझं वाक्य नाही, तर आर. आर. आबांचं आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मला एकच सांगायचं आहे की निदान आबांच्या भाषणावर तरी विश्वास ठेवा. दोन नंबरला काहीही किंमत नसते. जो भी कुछ है देवाभाऊ ही है, असे चव्हाण म्हणाले. त्यामुळे त्यांचा हा टोला पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच असल्याचा तर्क लावण्यात येत आहे. कोकणासह राज्यातील अनेक भागात शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजपवर पैसे वाटपाचे गंभीर आरोप केले आहेत. तर शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवारच भाजपमध्ये गेल्याने शिंदे सेना आक्रमक झाली आहे. त्यामुळे महायुतीमध्येच राजकीय पेटल्याची चिन्हे दिसून येत आहे.

Web Title: Eknath shinde vs ravindra chavan in mahayuti dispute maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Mahayuti
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
4

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.