Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Zilla Parishad : सातारा जिल्हापरिषद सभेकडे सर्वांच्याच नजरा; सभा शांततेत होणार की वादळी होणार?

Satara News : भाजप आणि शिंदे गटामध्ये झालेल्या राजकीय वादंगानंतर सातारा जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 16, 2026 | 12:53 PM
Satara News: झेडपीच्या रुग्णवाहिका वाहनांचा 'स्पेशल ऑडिट' होणार?

Satara News: झेडपीच्या रुग्णवाहिका वाहनांचा 'स्पेशल ऑडिट' होणार?

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा परिषदेची पहिली विशेष सभा
  • अध्यक्ष-उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीच्या नाट्यानंतर सभा
  • संपूर्ण राज्याचे लागले लक्ष
Satara Zilla Parishad : सातारा :सातारा जिल्हा परिषदेच्याअध्यक्ष-उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीच्या नाट्यानंतर शुक्रवारी दुपारी २ वाजता पहिली विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. ही सभा वादळी होणार का? विरोधकांची भूमिका काय राहणार? याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उत्सुकता आहे. या सभेत विविध स मित्यांसाठी सदस्यांच्या निवडी होणार आहेत. (Maharashtra Politics)

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वसाधारण सभा होणार आहे. सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सदस्य विविध विषयांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना या सभेसाठी आपल्या विभागाचा लेखाजोखा घेऊनच बसावे लागणार आहे.

हे देखील वाचा : कोरेगावात शंभूराज देसाईंची ‘चाल’ सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली

निवडीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

या सभेत सर्व विषय समिती सदस्यांच्या निवडी होणार आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून त्यासंदर्भात त्यांना निवडीबाबत विशेष प्रशिक्षणही दिले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड व विषय समिती सभापतीच्या निवडीवेळी झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, कृषी समिती, समाजकल्याण, शिक्षण व क्रीडा, बांधकाम, अर्थ, पशुसंवर्धन व दुग्धशाळा, आरोग्य, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य निवडीच्या अनुषंगाने ही विशेष सभा होणार आहे. या निवडीसाठी विस्तार अधिकाऱ्यांना मतदान अधिकारी क्रमांक १ तर कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना मतदान अधिकारी क्रमांक २ म्हणून निवड केली आहे.

अध्यक्षांना स्थायी व जलसंधारण सभापतिपद तर समितीचे उपाध्यक्षांकडे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापतिपद देण्यात येणार आहे. याशिवाय उपाध्यक्ष व सभापतींना विषय समित्यांचा पदभार सोपवणे. विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे, विभागप्रमुखांना विषय समित्यांचे सचिव म्हणून निवड करणे आदी ३ विषय चर्चेला ठेवले आहेत.

हे देखील वाचा : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे बिगुल…! विधानपरिषदचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद सेस फंड निधी खर्चाचा विषय चर्चिला जाणार

जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक म्हणून कामकाज पाहत असताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी इमारतींसाठी अतिरिक्त निधी तरतूद करीत असताना जिल्हा परिषद सेस फंडाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांना सेस फंडामध्ये रक्कम शिल्लक नसल्याने निधीचा तुटवडा भासणार आहे. अशा परिस्थितीत प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने खर्च केलेले सेस फँडाचा विषय चर्चिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: First general body meeting of the satara zilla parishad after dispute over the presidents post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • political news
  • Satara News
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू
1

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू

GI मानांकन मिळूनही कोरेगावचा घेवडा पीक विम्यापासून वंचित! अमित भोईटेंची कृषी उपसंचालकांकडे ‘ही’ मागणी
2

GI मानांकन मिळूनही कोरेगावचा घेवडा पीक विम्यापासून वंचित! अमित भोईटेंची कृषी उपसंचालकांकडे ‘ही’ मागणी

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी
3

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
4

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.