Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 29, 2026 | 05:55 PM
'शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे'; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

'शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे'; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.

शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट कर्जमाफी देऊन त्यांचा ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.

आमदार रोहित पवार यांनी पुकारले ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलन

शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या न्याय्य मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श.प.) आमदार रोहित पवार यांनी पुकारलेल्या ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सहभाग घेतला, यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, खासदार कल्याण काळे, खासदार अमर काळे, खासदार बजरंग सोनवणे, राजेश टोपे, अनिल देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर, मा. आ. सुनील भुसारा यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना

“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करेपर्यंत एल्गार सुरूच राहील

“भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार अत्यंत खोटारडे आहे. भाजपा संसदेत खोटे बोलतो, राम मंदिरात खोटे बोलतो, तसाच शेतकऱ्यांशीही खोटे बोलतो. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची घोषणा भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण सत्तेत येताच त्यांनी फसवी कर्जमाफी जाहीर केली आहे.”

“शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षांनी एल्गार पुकारला असून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करेपर्यंत हा एल्गार थांबणार नाही,” असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

‘लाडक्या बहिणी’प्रमाणेच शेतकऱ्यांचीही फसवणूक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, “शेतमालाला भाव नाही, महागाई प्रचंड वाढली आहे. शेती करणे परवडणारे नाही, शेती व शेतकरी दोन्ही संकटात आहे पण भाजपा सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. लाडक्या बहिणींची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक व विश्वासघात भाजपा सरकारने अन्नदात्याचाही केला आहे.”

“सात बारा कोरा करण्याची वल्गणा केली होती पण जाहीर केलेली कर्जमाफी मात्र फसवी आहे, लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मागील दोन महिन्यांपासून काँग्रेस व मित्रपक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत पण सरकार काही जागे होत नाही. सरकारला जाग येईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही,” असेही सपकाळ म्हणाले.

‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा

टीईटी पेपरफुटीवरही सरकारवर निशाणा

टीईटी पेपर फुटीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “ही काही पहिलीच पेपरफुटी झालेली नाही. भाजपा सरकारच्या काळात आत्तापर्यंत ७७ वेळा पेपरफुटी झालेली आहे. पेपरफुटी हा धंदा बनला असून व्यापमपेक्षाही हा मोठा घोटाळा आहे. सरकार नावाची यंत्रणा व व्यवस्था कुठेच दिसत नाही. विद्यार्थी व पालकांची क्रूर थट्टा सुरु असून तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरु आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठे आंदोलन हाती घेतलेले आहे,” असेही सपकाळ यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आणि ७/१२ कोरा करण्याच्या मागणीवरून राज्यातील विरोधकांनी सरकारविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. आगामी काळात या मुद्द्यावर राज्यात आंदोलनाची धार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Harshvardhan sapkal slams bjp over farm loan waiver 712 kora demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • Harshvardhan Sapkal
  • Mahavikas Aghadi
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे
1

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा
2

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

‘राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा’; मोदी, RSS आणि ट्रस्टवर हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी
4

‘राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा’; मोदी, RSS आणि ट्रस्टवर हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.