चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या 'रामरक्षा' पठणाला म्हटले 'ढोंगीपणा' (Photo Credit- X)
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “जेव्हा रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची खरी गरज होती, तेव्हा उद्धव ठाकरे कुठेच दिसले नाहीत. परंतु आता जेव्हा पक्षातील सर्व नेत्यांनी आणि जनतेने त्यांना सोडले आहे, तेव्हा त्यांना अचानक प्रभू श्रीरामाची आठवण झाली आहे.” उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण म्हणजे केवळ राजकीय ढोंगीपणा असून त्यांनी श्रीरामाला राजकीय मुद्दा बनवले आहे. याउलट, भाजप आणि आमच्यासाठी प्रभू श्रीराम हे राजकीय मुद्दा नसून श्रद्धा, मूल्ये आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत, असेही ते म्हणाले.
Nagpur, Maharashtra: Reacting to Shiv Sena (UBT) chief and former Chief Minister Uddhav Thackeray’s “Ram Raksha campaign,” Minister Chandrashekhar Bawankule says, “Launching an agitation is his democratic right, but if Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray were watching today,… pic.twitter.com/OG66YPBB9M — IANS (@ians_india) July 17, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून सुनेत्रा पवार नाराज? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नाही, असे सांगत बावनकुळे यांनी फडणवीसांचे कौतुक केले. “देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच रामजन्मभूमी आंदोलनाशी जोडलेले आहेत. त्यांनी हिंदू परंपरा आणि संस्कृतीच्या जतनासाठी काम केले आहे. बाबरी आंदोलनातील कारसेवेत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, तर दुसरीकडे टीका करणारे लोक त्यावेळी घरात निष्क्रिय बसून होते,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा नागपूरला येतात, तेव्हा ते केवळ राजकीय विरोधकांवर वैयक्तिक टीका करण्यापलीकडे काहीच करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
या राजकीय वादाची पार्श्वभूमी अशी की, उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहिले आहे. नागपुरात आयोजित पक्षाच्या ‘रामरक्षा’ मोहिमेत भागवत यांनी सहभागी व्हावे, असे निमंत्रण या पत्राद्वारे देण्यात आले आहे. अयोध्या राम मंदिरातील देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला असून यामुळे हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या गेल्याचा आरोप राऊत यांनी पत्रात केला आहे. हा वादग्रस्त कार्यक्रम १८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजता नागपूरमधील रामनगर येथील राम मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘रामदास आठवलेंना भेटले तर…’






