Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झाले”; यशोमती ठाकूर यांचा देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षात नेमके काय स्थान होते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 24, 2026 | 03:05 PM
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झाले”; यशोमती ठाकूर यांचा देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कृपेमुळे मुख्यमंत्री झाले
  • यशोमती ठाकूर यांचा देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
मुंबई : काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षात नेमके काय स्थान होते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. फडणवीस हे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कृपेमुळे मुख्यमंत्री झाले, अन्यथा त्यांना भाजपमध्ये कोणीही विचारत नव्हते, असा दावा ठाकूर यांनी केला. आपल्यासारखा “माल” आज महाराष्ट्र ओझे म्हणून पाठीवर वाहतोय, अशा अत्यंत तिखट शब्दांत त्यांनी फडणवीसांचा उल्लेख केला.देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर रिजेक्टेड माल अशी टीका केली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी थेट फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यातील सद्यस्थितीवर बोट ठेवत यशोमती ठाकूर यांनी गृहखात्याच्या नाकर्तेपणावर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्रातील महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था आज पूर्णपणे कोलमडली असून, गुंड, पुंड आणि मवाली राज्याच्या गृहखात्यावर थयथय नाचत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राज्यात आज इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे जनतेमध्ये हाणामारीच्या घटना घडत आहेत. इतकेच नव्हे तर, कायदा राखणाऱ्या पोलिसांच्या गाड्यांनाही आज डिझेल मिळेनासे झाले आहे, हाच का तुमचा आणि तुमच्या नेत्याचा पराक्रम? असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत मतभेद; एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी सुरु

 

देवेंद्र फडणवीस जी राहुलजी गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःला जोखा! देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षात काय स्थान होते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो! फडणवीसजी संघाच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झालात. नाहीतर भाजपमधून तुम्हाला कोण विचारत होते? आपल्यासारखा “माल” ओझे… pic.twitter.com/ce3yYhsSRO — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) May 21, 2026

फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात ‘पोलीस राज’ अवतरल्याचा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला. स्वतःचा हक्क आणि नुकसान भरपाई मागण्यासाठी जेव्हा शेतकरी रस्त्यावर येतो, किंवा पेपर फुटीच्या विरोधात हताश झालेले विद्यार्थी आंदोलनासाठी उतरतात, तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारची पोलीस फौज तात्काळ तयार असते, या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

यासोबतच, राज्यातील विविध गंभीर मुद्द्यांना हात घालत ठाकूर यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सोमनाथ सूर्यवंशी सारखे तरुण आज पोलीस कोठडीत अत्याचाराचे बळी ठरत आहेत, तर दुसरीकडे सहकारी बँकांमध्ये भाजपचेच पदाधिकारी मोठे घोटाळे करून बँका दिवाळखोरीत काढत आहेत, असा आरोप त्यांनी केला. “अजून काय सांगायचं या असल्या ‘माला’ बद्दल!” असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली आहे.

“देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर ‘सर्कस’ सुरू,” इंधन टंचाईवरून अंबादास दानवे यांचा सरकारवर निशाणा 

Web Title: He became the chief minister due to the grace of the rashtriya swayamsevak sangh rss yashomati thakur strongly attacks devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • political news
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?
2

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक
3

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक

Niti Aayog : नीती आयोगाच्या क्रमवारीत गडचिरोली देशात अव्वल; ‘या’ गोष्टीत आगेकूच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा
4

Niti Aayog : नीती आयोगाच्या क्रमवारीत गडचिरोली देशात अव्वल; ‘या’ गोष्टीत आगेकूच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.