भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने एमपी सुप्रिया सुळे यांची नाराजी व्यक्त केली (फोटो - सोशल मी़डिया)
Supriya Sule : मुंबई : संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने दिल्लीच्या कर्तव्यपथावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day 2026) उत्साह दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांची नावे जाहीर करण्यात आली. समाजातील तळागाळात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, काल (दि.25) 45 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्वात अनपेक्षित असे नाव होते ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचे. त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य केली आहेत. त्यांनी संत तुकाराम महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन अपमान केला होता. यानंतर देखील अनेकदा वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत माध्यमांनी प्रश्न करताच त्यांनी थेट हात जोडले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी थेट हात जोडत राम कृष्ण हरी म्हटलं आहे.
हे देखील वाचा : “मस्ती असेल तर पाकिस्तानात जा..”, पालकमंत्री Sanjay Shirsat यांनी Imtiaz Jaleel यांना सुनावले खडेबोल
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्याला जाऊन आले आहेत. यामध्ये त्यांनी अनेक करार केले आहेत. मात्र या कंपनी भारतीय असल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सगळ्याच राज्याचे मुख्यमंत्री दावोसला जात असतात. नेमकं आपल्या राज्याच्या पदरी काय पडलं? हे पाहण महत्वाच आहे. कारण मागच्या वर्षी जे करार झाले त्याच पुढे काय झालं? किती गुंतवणूक झाली? किती जणांना नोकऱ्या मिळाल्या? हे पाहण महत्वाच आहे. दावोसला जाण्याबाबत माझी हरकत नाही. मात्र जगात जे सुरू आहे त्यामुळे मला चिंता वाटत आहे. जगातील काही देशांची काय परिस्थिती झाली हे सगळ्यांच्या समोर आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात
भगतसिंह कोश्यारी यांना पद्म पुरस्कार मिळाल्याने खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. खासदार राऊत यांनी सोशल मी़डिया पोस्ट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान! ” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. उद्या दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.






