Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या खासदारांची ‘मातोश्री’वर आज महत्त्वपूर्ण बैठक; ‘या’ मुद्यांवर होणार चर्चा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप राज्याच्या राजकीय वर्तुळात मागील काही महिन्यांपासून सातत्याने होत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट चांगलाच अलर्ट झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 14, 2026 | 09:48 AM
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज 'मातोश्री'वर महत्त्वपूर्ण बैठक; पक्षफुटीच्या भीतीचे चर्चा?

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज 'मातोश्री'वर महत्त्वपूर्ण बैठक; पक्षफुटीच्या भीतीचे चर्चा?

Follow Us
Follow Us:

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षातील लोकसभेच्या २० खासदारांनी भाजपप्रणित एनडीएला समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे. तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर ममता बॅनर्जीच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची आज (दि.१४) बैठक बोलावली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप राज्याच्या राजकीय वर्तुळात मागील काही महिन्यांपासून सातत्याने होत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट चांगलाच अलर्ट झाला आहे. ‘ऑपरेशन टायगर’बाबत शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेच्या खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर आहे. अशी बैठक म्हणजे कोणत्याही पक्षात सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. अशा बैठका ‘मातोश्री’वर सातत्याने होत असतात. पुढच्या महिन्यात लोकसभेचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सगळ्या नऊ खासदारांना बोलावून उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली साताऱ्यात उदयनराजे यांची भेट, आगामी राजकीय समीकरणांवर चर्चा

‘ऑपरेशन टायगर’ करणार असं जे म्हणतात त्यांचे ऑपरेशन अमित शाह यांनी शंभरवेळा केले आहे. माणसं फोडणं ही एक प्रकारची विकृती आहे. जेव्हापासून या देशात मोदी-शाहांचे राज्य आलंय तेव्हापासून या विकृतीने कळस गाठला आहे. महाराष्ट्रासारखं राज्यसुद्धा त्यांनी नासवलं आहे. योग्यवेळी राज्यात आणि देशात या विकृतीविरोधात जनता बंड करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

‘ऑपरेशन टायगर’ होणार का?

ठाकरेंचे खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची व काही दिवसांत ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मागील काही महिन्यांत ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांनी एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मागील काही महिन्यांत संजय दीना पाटील हे शिंदे यांच्यासोबत एकाच कारने प्रवास करताना आढळून आले होते. खासदार राजाभाऊ वाजे हे तर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एका मंचावर दिसले होते. तर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.

‘अरे अरे गोपीचंद…काय रे तुझा छंद…’ राष्ट्रवादी शरद पवार गटाची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका

Web Title: Important meeting of thackeray group mps at matoshree today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • political news
  • Shivsena Politics
  • Thackeray Group
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Aditya Thackeray: “शेतकरी संकटात, तातडीने मदत द्या!”; खानापूरमध्ये आदित्य ठाकरेंची पाहणी अन् धीर!
1

Aditya Thackeray: “शेतकरी संकटात, तातडीने मदत द्या!”; खानापूरमध्ये आदित्य ठाकरेंची पाहणी अन् धीर!

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
2

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग
3

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
4

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.