Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News: ‘आयुक्त म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर’; केडीएमसी आयुक्तांच्या उपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल

KDMC News: केडीएमसीतील शिवसेना आघाडीच्या नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरात आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने आयुक्तांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने वागत असल्याचा आरोप केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2026 | 04:37 PM
'आयुक्त म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर'; केडीएमसी आयुक्तांच्या उपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल

'आयुक्त म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर'; केडीएमसी आयुक्तांच्या उपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • केडीएमसी आयुक्तांच्या शिवसेना शिबिरातील उपस्थितीवरून वाद
  • काँग्रेसची अभिनव गोयल यांच्यावर टीका
  • पण पक्षाच्या शिबिरात आयुक्त हजर?
KDMC News Marathi: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC News) शिवसेना आघाडीच्या नगरसेवकांचे प्रशिक्षण शिबिर भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे पार पडले. या शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. मात्र, या कार्यक्रमात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीमुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

केडीएमसी आयुक्तांनी एका राजकीय पक्षाच्या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहिल्याने त्यांच्या प्रशासकीय तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. काँग्रेसने या उपस्थितीवर तीव्र आक्षेप नोंदवत आयुक्तांवर थेट टीका केली आहे.

काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी आरोप केला की, शहरातील नागरिक गंभीर समस्यांचा सामना करत असताना आयुक्तांनी त्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणे अयोग्य आहे. त्यांनी टीका करत “केडीएमसी आयुक्त म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर” अशी प्रतिक्रिया दिली.

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपला; मनसेचा मोठा पाठिंबा

काँग्रेसच्या मते, कल्याण-डोंबिवली शहरात पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरणे, रस्त्यांवरील मोठे खड्डे, तसेच अलीकडेच रुक्मिणीबाई रुग्णालयात एका लहान मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई अडकल्याची धक्कादायक घटना अशा अनेक गंभीर समस्या प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर प्रशासनाने प्राधान्याने लक्ष देणे अपेक्षित असताना आयुक्त पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्याने नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, शिबिराचे आयोजक मात्र या प्रशिक्षणाचा उद्देश नगरसेवकांना विकासकामे, प्रशासकीय प्रक्रिया आणि महापालिकेच्या कामकाजासंदर्भात माहिती देणे हा असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आयुक्तांची उपस्थिती ही प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने असल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे.

दरम्यान, या उपस्थितीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या मर्यादा आणि तटस्थतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता या वादावर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची अधिकृत भूमिका काय असते आणि महापालिका प्रशासन याबाबत कोणते स्पष्टीकरण देते, याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”

Web Title: Kdmc commissioner abhinav goyal shiv sena corporators training camp political row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan
  • KDMC
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
1

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
2

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Sunil Prabhu Car Accident: ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्लेत अपघात, एक जण जखमी
4

Sunil Prabhu Car Accident: ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्लेत अपघात, एक जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.