महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या स्मरणार्थ योजनांची घोषणा केली (फोटो - एक्स)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा दिवंगत नेते अजित पवारांना समर्पित केला. यावेळी सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस हे भावूक झालेले दिसून आले. अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत फडणवीसांना त्यांना आदरांजली वाहिली. तसेच अजित पवार यांच्या स्मरणार्थ काही प्रकल्प देखील जाहीर केले आहेत. तसेच राज्याच्या प्रगतीमध्ये आणि अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये अजित पवारांचा मोठा वाटा असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा : “…फिर देखना फिजूल है कद आसमान का”; फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि दीर्घ काळ वित्तमंत्री राहिलेले आपले अजितदादा आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक आणि प्रशासकीय जीवनात कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी एकूण 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यांचे आणि अर्थसंकल्पाचे नाते अतिशय दृढ होते. त्यांनी विक्रमी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. कामाचा माणूस हीच त्यांची खरी ओळख होती.”
पुढे ते म्हणाले की, “अजित पवारांमुळे महाराष्ट्राची कठीण काळातही अर्थिक स्थिती भक्कम राहिली. त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्वांशी चर्चा करुन अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे देखील वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा विधीमंडळातील ठराव मागे; नेमकं कारण काय?
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी एका पुरस्काराची देखील घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, “अजित पवारांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो. दिवंगत नेते अजित पवारांच्या स्मृतींना मी आजचा अर्थसंकल्प मी समर्पित करतो,” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.






