Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : पुत्र प्रेमापोटी कोकणातील ‘या’ नेत्याला डावललं? विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर येत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा आता पक्षफुटीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. पुत्र प्रेमापोटी कोकणातील 'या' नेत्याला डावललं? असल्याची चर्चा रंगत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 09, 2025 | 05:10 PM
विरोधी पक्षनेतेपदावरून संघर्ष? ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा

विरोधी पक्षनेतेपदावरून संघर्ष? ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा

Follow Us
Close
Follow Us:
  • ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा
  • शिवसेना ठाकरे गटात आणखी एक फूट पडण्याची दाट शक्यता
  • भाजप-शिवसेनेतही तीव्र मतभेद
Maharashtra Politics News Marathi:  गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप पाहायला मिळत आहे. सर्वात आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत ४० हून अधिक आमदार फोडत भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीतही फूट पडली. अनेक आमदारांसह बाहेर पडत अजित पवार यांनीही महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या दोन घटनांमुळे राज्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशात झाली होती. अशातच आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.  विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गटातच अंतर्गत स्पर्धा सुरु झाल्याची चर्चा आहे. कारण विरोधी पक्ष नेतेपदासाठी आतापर्यंत भास्कर जाधव प्रबळ दावेदार मानले जात होते. पण आता आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics: महापालिका निवडणुका MVA एकत्रित लढणार? ‘या’ नेत्याचे कार्यकर्त्यांना निर्देश

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा आता पक्षफुटीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. या पदासाठी कोकणातील एक वरिष्ठ नेते इच्छुक होते. मात्र मातोश्रीने दुसरेच नाव पुढे केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात आणखी एक फूट पडण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य फुटीवरून भाजप-शिवसेनेतही तीव्र मतभेद उफाळल्याचे वृत्त आहे.

नागपूरचे हिवाळी अधिवेशन आणि राजकीय भूकंप समीकरण बनले आहे. यंदाही विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर कोकणातून शिवसेनेचा एक ‘पावरफुल’ नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे यांचं पुत्र प्रेम की ‘मातोश्री’ सोबत एकनिष्ठ राहिलेला कोकणातील नेता…नेमकं ठाकरेंच्या मनात काय आहे? विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर कोणाची निवड होणार?  हे पाहणं महत्त्वाचा ठरणार आहे.

शिंदे गटाचा प्रवेशाला विरोध

शिवसेना ठाकरे यांच्या आमदारांना भाजपने प्रवेश देऊ नये, असा आग्रह शिंदे गटाने केला आहे.  मात्र पक्षप्रवेश अटळ असेल, तर हे आमदार भाजपमध्ये नव्हे तर शिंदे गटाच्या शिवसेनेत यावेत, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. ठाकरेची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असलेले हे आमदार भाजपमध्येच जाण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे यावर तोडगा कसा काढावा, या संकटात भाजप नेते असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा अंतिम फैसला आता दिल्लीतून होण्याची शक्यता आहे.

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ‘मातोश्री’ची ताकद कमी झाली. उद्धव ठाकरे यांना अनेक विश्वासू सहकारी सोडून गेले. अशा कठीण परिस्थितीतही कोकणातील हा नेता ‘मातोश्री’ सोबत एकनिष्ठ राहिला. सत्ताधाऱ्यांच्या आक्रमणाला पुरूनही उरला. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद देऊन त्यांना योग्य मान मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. अचानक या पदासाठी आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आल्यामुळे ते नाराज झाले आहेत. त्यामुळे ते १० आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

Maharashtra Politics : 2029 मध्ये महायुतीचं सरकार जाणार…! सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या मराठा नेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Web Title: Maharashtra political shivsena ubt thackeray group on the brink of split again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

मुंबईत अनेक कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश; संघटनेला मिळाली नवी ताकद
1

मुंबईत अनेक कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश; संघटनेला मिळाली नवी ताकद

“त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा…! सामाजिक नेते बाबा आढाव यांच्यासाठी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
2

“त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा…! सामाजिक नेते बाबा आढाव यांच्यासाठी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

Mahendra Dalvi Replied Ambadas Danve: तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा पलटवार
3

Mahendra Dalvi Replied Ambadas Danve: तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा पलटवार

Ambadas Danve News: शिंदे गटाचा आमदार, नोटांचा ढिग, व्हिडिओ व्हायरल; अंबादास दानवेंचा ‘कॅश बॉम्ब’  Video
4

Ambadas Danve News: शिंदे गटाचा आमदार, नोटांचा ढिग, व्हिडिओ व्हायरल; अंबादास दानवेंचा ‘कॅश बॉम्ब’ Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.