Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange : मराठ्यांचा पुन्हा एल्गार, नारायणगडावर लाखोंच्या संख्येनं जमण्याचं जरांगेंचं आवाहन

Manoj Jarange : नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी लाखो मराठ्यांनी एकत्र यावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांसह दुष्काळावर भाष्य केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 04, 2026 | 06:24 PM
Manoj Jarange : मराठ्यांचा पुन्हा एल्गार, नारायणगडावर लाखोंच्या संख्येनं जमण्याचं जरांगेंचं आवाहन

Manoj Jarange : मराठ्यांचा पुन्हा एल्गार, नारायणगडावर लाखोंच्या संख्येनं जमण्याचं जरांगेंचं आवाहन

Follow Us
Follow Us:
  • निवडणूक आयोगावर निशाणा
  • सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा जरांगेचा आरोप
  • शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी
 

‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा आता पुन्हा एकदा नव्या दमानं, नव्या जोशात गुमगुमताना दिसणार आहे. निमित्त आहे, नारायणगडावरील ‘दसरा मेळावा’. यंदाच्या या मेळाव्याला मराठी बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्र जमण्याचे आवाहन मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange ) यांनी केले आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात जरांगे यांनी आपल्या विविध मांगण्यासाठी मुंबईत आंदोलन करण्याची हाक दिली होती. ते त्या प्रवासाला निघालेही होते, परंतु शासनाने तातडीने हातपाय मारत जरांगे यांची भेट घेतली व त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. जरांगे यांच्या काही मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केले होते. आता जालन्यातून त्यांनी दसरा मेळाव्यासाठी नारायणगड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन मराठ्यांना केले आहे.

निवडणूक आयोगावर निशाणा

पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, भाजप सरकारने ज्ञानेश कुमार यांना काढून दुसऱ्याला तिथे नियुक्त करावे. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांची मिलीभगत आहे का? असा संशय बळावत आहे. सरकारने ज्ञानेश कुमार यांना काढून टाकले पाहिजे. यांची गुंडगिरी आणि दहशत आता लोकांना सहन होत नाही नसल्याचे सांगत निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की, सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देऊन त्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. जर जनता तुम्हाला सत्तेवर बसवू शकते, तर तुम्हाला खाली पण खेचू शकते असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

आता संयमाचा बांध तुटणार

मराठ्यांचे लोकं आरक्षण मागायला लागले तर दादागिरी करायची आणि ते मोडून काढायचे असा खेळ सुरू असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. आता संयमाचा बांध तुटणारच आहे. मला प्रचंड त्रास देणे सुरू आहे. मराठा आंदोलकांना त्रास देणे सुरू आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, जरांगे पाटलांनी यावेळी सरकारवर अनेक विखारी शब्दांमध्ये घणाघात केला आहे. घोषित हुकूमशाही सुरू आहे, आता सत्ताधाऱ्यांची जुलमी राजवट सुरू आहे, हे सरकार प्रचंड अन्यायकारी आहे. असंही जरांगेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कसकाय होत नाही, या प्रश्नावरुन त्यी सरकारला घेरलं आहे. सरकारने गावागावात चारा छावण्या सुरू कराव्यात. मी सरकारचा मित्र व्हायला तयार नाही. मला सरकारपुढे झुकवण्यासाठी ज्या-ज्यावेळी डाव टाकले जातील, त्या-त्यावेळी मराठा समाज 100 पट ताकदीने एकत्र आला पाहिजे, असंही यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. याशिवाय त्यांनी दसरा मेळाव्याबद्दलची भूमिकाही जाहीर केली आहे. नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने यावं असेही ते म्हणाले.

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

 

Web Title: Manoj jarange narayangad maratha dasara melava

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • drought news
  • Election Comission
  • Manoj Jarang patil

संबंधित बातम्या

‘आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार’; मुंबईत महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
1

‘आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार’; मुंबईत महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Wardha News : वर्ध्यात दुष्काळाचं संकट! पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, १० ऑक्टोबरला अहवाल
2

Wardha News : वर्ध्यात दुष्काळाचं संकट! पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, १० ऑक्टोबरला अहवाल

‘विघ्नहर्त्या दुष्काळ दूर कर’! अंगारकीला गणपतीपुळ्यात भाविकांचे ‘श्रीं’च्या चरणी साकडे
3

‘विघ्नहर्त्या दुष्काळ दूर कर’! अंगारकीला गणपतीपुळ्यात भाविकांचे ‘श्रीं’च्या चरणी साकडे

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
4

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.