Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सरकारला १२ तारखेपर्यंत वेळ आहे, अंतरवालीत येताना आंदोलकांवर हल्ला झाल्यास तीव्र प्रतिक्रिया उमटेल, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 07, 2026 | 02:54 PM
'...तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा

'...तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • ‘१२ तारखेला सर्व मराठ्यांनी अंतरवालीत यावे’
  • मनोज जरांगे पाटील यांचे समाजाला आवाहन
  • सरकारला १२ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम
Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सलग दहाव्या दिवशी सुरू आहे. सरकारने आपल्या मागण्या मान्य न केल्यास १२ सप्टेंबर रोजी मुंबईकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिला असून आंदोलन आणखी तीव्र केले आहे.

१२ तारखेपर्यंत वेळ

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचे आवाहन केले आहे. येत्या १२ सप्टेंबर रोजी राज्यभरातील मराठा समाजबांधवांनी अंतरवाली सराटी येथे यावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारला आपल्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी १२ तारखेपर्यंत वेळ दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Maratha Reservation: ‘मराठा आंदोलनातील मृतांच्या…’, मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

जरांगे पाटील यांनी आंदोलनादरम्यान शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी कितीही त्रास दिला तरी मराठा आंदोलकांनी पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या काळात समाजबांधवांनी संयम बाळगावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, अंतरवाली सराटीकडे येणाऱ्या मराठा आंदोलकांवर हल्ला झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. “अंतरवालीत येताना कुणावर हल्ला झाला, एकाचंही रक्त निघालं तर १० मिनिटांच्या आत अख्खा महाराष्ट्र बंद पडला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे १२ सप्टेंबरकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील विविध भागांत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उपोषणे, रास्ता रोको आणि इतर आंदोलने सुरू असतानाच अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने समाजबांधवांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारने १२ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, अशी जरांगे पाटील यांची भूमिका आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकारकडून काय भूमिका घेतली जाते आणि १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

आंदोलनाचा आज दहावा दिवस

मराठा आरक्षण आंदोलन आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या आठव्या दिवसापासून पाणी आणि सलाईन घेणे बंद केले. तसेच वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिला. आज त्यांच्या आंदोलनाचा दहावा दिवस आहे. आपल्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय कोणताही पर्याय स्वीकारणार नसल्याची ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेला पुन्हा वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. प्रमुख मागण्यांपैकी काही मागण्यांवर दोन दिवसांत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर त्यांनी पाणी आणि सलाईन घेण्यास संमती दिली होती. मात्र, अपेक्षित प्रगती होत नसल्याचे सांगत त्यांनी पुन्हा पाणी घेण्यास नकार दिला.

जरांगे पाटील यांचे उपोषण कधीपासून?

मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२६ पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज, सोमवार ७ सप्टेंबर रोजी त्यांच्या आंदोलनाचा दहावा दिवस आहे. ५ सप्टेंबरपासून त्यांनी पाणी तसेच कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारने मागण्यांवर निर्णय न घेतल्यास १२ सप्टेंबर रोजी मुंबईत मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीला सापडलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. याशिवाय मराठा विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ‘सारथी’ संस्थेला निधी उपलब्ध करून देणे, हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणे, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि ‘मराठा व कुणबी’ यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे, अशा विविध मागण्याही त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. आता सरकार या मागण्यांबाबत काय निर्णय घेते आणि १२ सप्टेंबरपूर्वी आंदोलनावर तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

Web Title: Manoj jarange patil calls maratha community to gather at antarwali on september 12

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Kunbi
  • maharashtra
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maratha Reservation: ‘मराठा आंदोलनातील मृतांच्या…’, मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
1

Maratha Reservation: ‘मराठा आंदोलनातील मृतांच्या…’, मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
2

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार
3

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त
4

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.