Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या दोन मागण्या झाल्या मान्य; काय असणार पुढची रणनीती?

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी येत्या 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2025 | 02:57 PM
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मनोज जरांगेंनी केली 'ही' मागणी; 'देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...'

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मनोज जरांगेंनी केली 'ही' मागणी; 'देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...'

Follow Us
Close
Follow Us:

जालना :  मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जानेवारीमध्ये जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण देखील केले. यानंतर त्यांनी उपोषण स्थगित करत राज्यभर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे मराठा आरक्षण आणि आंदोलकांसंबंधित 8 मागण्या केल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारवेळी जरांगे पाटील यांनी या मागण्या केल्या होत्या. यातील चार मागण्या या मान्य केल्या जातील असे आश्वासन सरकारकडून दिले जात होते. त्यातील दोन मागण्या या मान्य झाल्या आहेत. शिंदे समितीला राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. मात्र इतर देखील मागण्या पूर्ण करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज्य सरकारने शिंदे समितीला मुदत वाढ दिली आहे. आता त्या समितीला मनुष्यबळ द्या. समितीला बसवून ठेवू नका. फक्त मुदत वाढ देऊन उपयोग नाही, आता महाराष्ट्रभर ही समिती गेली पाहिजे. समितीने नोंदी शोधल्या पाहिजे. समितीला बसण्यासाठी कक्ष दिले पाहिजे. त्यांना निधी कमी पडता कामा नये. सगळ्या व्हॅलिडीटी झाल्या पाहिजे. जे प्रमाणपत्र रोखून धरले ते तात्काळ दिले पाहिजे,” असे स्पष्ट मत मराठा नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटबाबत मत व्यक्त केले आहे. यामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असल्याचा दावा केला जातो. या गॅझेटबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करतो असे सांगितले आहे. बॉम्बे गव्हर्मेंट आणि सातारा संस्थान हे आता शिंदे समितीकडे आहे. आता सरकार त्याच्यावर अभ्यास करणार आहे. गॅझेटचा अभ्यास शिंदे समितीने केलेला आहे. आता तो सरकारला करायचा आहे. त्यामुळे गॅझेटच्या अंमलबजावणीची वाट आम्ही आता पाहत आहोत,” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

आंदोलन करणार का? 

येत्या 15 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला होता. याबाबत मत मांडताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “पंधरा तारखेपासून उपोषण करण्याचे ठरवले होते. त्यामुळे आज संध्याकाळी किंवा उद्या मी गावकऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी आंतरवालीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात निर्णय जाहीर करू. परंतु आता मागण्या मान्य करायला लागले म्हणून आम्ही सुद्धा बोलणार नाही. फक्त तुम्ही खोटे करू नका हे आमचे मागणे आहे. तुम्ही मराठा आंदोलन म्हणून कुणालाही नोटीस नाही देऊ शकत नाही .त्यांच्यावर दुसरे काही प्रकरण असेल तर ठीक आहे. परंतु मराठा आंदोलन म्हणून मी खपवून घेणार नाही. काल जो निर्णय सरकारने घेतलाय त्यावरून सरकार सकारात्मक आहे, असे वाटत आहे. पुढच्या मंगळवारपर्यंत ते मागण्या मान्य करतील,” असा विश्वास त्यांच्यावर ठेवू या, असे मत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Manoj jarange patil took an aggressive stand for maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश
1

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप
2

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?
3

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार
4

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.