Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : ‘एकही मागणी मान्य नाही’; जरांगे पाटलांचा सरकारवर घणाघात, भरत गोगावलेंनाही थेट इशारा

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष कायम आहे. सरकारने 12 मागण्या मान्य केल्याचा दावा केल्यानंतर जरांगे पाटलांनी हा दावा फेटाळून लावत भरत गोगावले आणि सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार पलटवार केला.

  • By विवेक
Updated On: Sep 08, 2026 | 09:29 PM
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:
  • सरकारने 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचा मंत्री उदय सामंत यांचा दावा.
  • ‘एकही मागणी मान्य नाही’ म्हणत मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम.
  • भरत गोगावलेंच्या ‘जशास तसं’ इशाऱ्याला जरांगेंचा थेट पलटवार
 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. सरकारसोबत मागण्यांवर चर्चा सुरू असली तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. एकीकडे सरकारकडून बैठका घेऊन मागण्या मान्य केल्याचं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे सरकारने काहीही मान्य केलं नसल्याचं जरांगे पाटील स्पष्टपणे सांगत आहेत.

मंत्री उदय सामंत यांनी सरकारने जरांगे यांच्या 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचं म्हटलं. मात्र हा दावा जरांगे पाटलांनी फेटाळून लावला आहे. ‘15 पैकी एकही मागणी मान्य झालेली नाही,’ असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

उदय सामंतांच्या वक्तव्यावर जरांगेंचा पलटवार

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलू नये, असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं. यावर जरांगे पाटील यांनी थेट उत्तर दिलं. “चुकीच्याला चुकीचं म्हणू नको काय? तुम्ही आम्हाला दलाल म्हणून बोलायला ठेवलं आहे का? तुमच्या मनगटात फक्त पैशाची ताकद आहे. शिंदेंनी चूक केली ती कबूल करा.”

Maratha Reservation : जरांगे पाटलांना मंत्र्यांचा थेट इशारा; ‘आमच्या नेत्यांवर बोलाल तर आम्हीही रस्त्यावर उतरू’

एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलल्याचं वाईट वाटलं, मात्र शिरसाटांचं ऐकून मराठा समाजाची प्रमाणपत्रं रद्द का केली, असा सवालही त्यांनी उदय सामंत यांना केला.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जरांगे यांनी निशाणा साधला. “राधाकृष्ण विखेंचं सोडून काहीही विचारा. मराठ्यांना याने अर्धवट फासावर सोडून दिलं. हा फक्त आंदोलन कसं मोडलं पाहिजे यांचं बघतो.” फडणवीस आणि शिंदे यांच्या सांगण्यावरून सरकारमधील मंत्री आपल्यावर हल्लाबोल करत आहेत का, असा सवालही त्यांनी केला.

‘एकही मागणी मान्य नाही’

सरकारने 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याच्या दाव्यावर जरांगे पाटील चांगलेच संतापले. “15 पैकी 12 मागण्या मान्य, याला न्याय देणं म्हणत नाहीत. खाली ते मान्य केलं जातं नाही, तुम्ही गरीबांचं वाटोळं केलं. तुम्ही मराठा समाजाला पश्चाताप करण्याच्या उंबरठ्यावर आणलं.”

सरकार शिष्टमंडळासमोर एक आणि नंतर वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “तुम्ही काहीही मान्य केलं नाही, 15 पैकी एकही मागणी मान्य झालेली नाही.”

Maratha Reservation : ‘गणेशोत्सवात मुंबईत येऊन अडचणी निर्माण करू नका,’ उदय सामंत यांचे मनोज जरांगेंना आवाहन

भरत गोगावलेंना जरांगेंचा इशारा

एकेरी भाषेत बोलल्यास जशास तसं उत्तर देऊ, असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं होतं. त्यावर जरांगे पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेतली. “मी तयार आहे, कधीही सज्ज आहे, माझ्या नादेला लागायचं नाही. माझ्याकडे पुरावा आहेत. मीडियात पुरावा देईन, मी शिंदेंवर बोलणार आहे.”

मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे नसतील तर शिष्टमंडळाने अंतरवालीत येऊ नये, असंही जरांगे यांनी सुनावलं. दरम्यान, नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीवरूनही त्यांनी भाष्य केलं असून, या सगळ्या घडामोडींमुळे आरक्षणाचा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Web Title: Maratha reservation manoj jarange government demands bharat gogawale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maratha Reservation : जरांगे पाटलांना मंत्र्यांचा थेट इशारा; ‘आमच्या नेत्यांवर बोलाल तर आम्हीही रस्त्यावर उतरू’
1

Maratha Reservation : जरांगे पाटलांना मंत्र्यांचा थेट इशारा; ‘आमच्या नेत्यांवर बोलाल तर आम्हीही रस्त्यावर उतरू’

Maratha Reservation : ‘गणेशोत्सवात मुंबईत येऊन अडचणी निर्माण करू नका,’ उदय सामंत यांचे मनोज जरांगेंना आवाहन
2

Maratha Reservation : ‘गणेशोत्सवात मुंबईत येऊन अडचणी निर्माण करू नका,’ उदय सामंत यांचे मनोज जरांगेंना आवाहन

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?
3

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
4

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.