Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : ‘मुंबईच नाही, दिल्लीही हलवू शकतो’; जरांगेंचा सरकारला इशारा, 12 तारखेला मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार

Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे. मुंबई आंदोलनासाठी नियोजनबद्ध तयारी करण्याचे आवाहन करत 12 तारखेला मुंबईची तारीख जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By विवेक
Updated On: Aug 29, 2026 | 08:37 PM
Manoj Jarange Patil,

Manoj Jarange Patil,

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगेंचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू
  • 12 तारखेला मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार
  • ‘मुंबईच नाही, दिल्लीही हलवू शकतो’; सरकारला जरांगेंचा इशारा
 

Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि आगामी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.

मुंबई आंदोलनासाठी नियोजनबद्ध तयारी

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाची तारीख येत्या 12 तारखेला जाहीर करणार असल्याचे सांगितले. मुंबईत आंदोलन पाच टप्प्यांत होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

“तीन दिवसांत मराठ्यांना मुंबईला नेऊन परत आणणे आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे यावेळी पक्की तयारी करायची आहे,” असे सांगत त्यांनी समाजबांधवांना नियोजनबद्ध पद्धतीने आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

यंदाचे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असले तरी ते सरकारला प्रभावीपणे जाणवले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. हे शेवटचे आंदोलन असल्याचे सांगत मागण्यांमध्ये कोणतीही माघार घेतली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मुंबईच नाही, दिल्लीही हलवू शकतो’

सरकारला इशारा देताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उल्लेख केला. सरकारला आपल्या ताकदीचा अंदाज असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नियोजनावर भर दिला.

“एकदा प्लॅनिंग झाली तर मुंबईच नाही, दिल्लीसुद्धा हलवू शकतो,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला. मराठा समाजापुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने मोटरसायकल आणि इतर वाहनांसह मुंबईकडे जाण्याचा उल्लेख केला. मात्र, आंदोलन शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

60 वर्षांखालील समाजबांधवांनाही आवाहन

जरांगे पाटील यांनी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. 50 ते 60 वर्षांच्या आतील समाजबांधवांनी मुंबईच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले. तरुण समाजासाठी लढत असताना इतरांनीही समाजाच्या प्रश्नांसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करत त्यांनी समाजबांधवांनी आंदोलनासाठी वेळ देण्याची गरज व्यक्त केली.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर; जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी

12 तारखेला पुढील दिशा स्पष्ट होणार

मुंबईतील आंदोलनासाठी 12 तारखेला तारीख जाहीर केली जाणार असल्याने त्यानंतर आंदोलनाचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे. मुंबईत दाखल होणाऱ्या समाजबांधवांसाठी आवश्यक नियोजन आणि तयारी करण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या मागणीसह जात पडताळणी आणि इतर मागण्यांवर सरकारकडून काय पावले उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांच्या नव्या आंदोलनामुळे राज्य सरकारसमोर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Maratha reservation manoj jarange warning government mumbai protest date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maratha Reservation: ‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’,अन्यथा… मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला अंतिम इशारा
1

Maratha Reservation: ‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’,अन्यथा… मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

‘जरांगे पाटलांचं आंदोलन फक्त स्वार्थासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी..,’ मनोज जरांगे पाटलांवर भाजप आमदाराचा घणाघात
2

‘जरांगे पाटलांचं आंदोलन फक्त स्वार्थासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी..,’ मनोज जरांगे पाटलांवर भाजप आमदाराचा घणाघात

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील;  जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा
3

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती
4

मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.