Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जरांगे पाटलांचं आंदोलन फक्त स्वार्थासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी..,’ मनोज जरांगे पाटलांवर भाजप आमदाराचा घणाघात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी जरांगेंच्या आंदोलनावर टीका करत हे आंदोलन स्वार्थासाठी असल्याचा आरोप केला आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 28, 2026 | 09:51 PM
'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात करणार.
  • विजय रहांगडालेंनी जरांगेंचे आंदोलन स्वार्थासाठी असल्याचा आरोप केला.
  • मराठा समाजाच्या सापडलेल्या नोंदींवरून कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागांतून मराठा समाजातील नागरिक अंतरवाली सराटीकडे रवाना होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, जरांगे यांच्या आगामी आंदोलनावर भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील हे स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी आणि स्वार्थासाठी आंदोलन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘आंदोलनाचा हेतू स्वतःचा स्वार्थ साधणे’

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, आंदोलनाचा मुख्य उद्देश भाजप नेत्यांवर टीका करणे, त्यांना शिवीगाळ करणे आणि स्वतःची राजकीय ओळख निर्माण करणे असा असल्याचा आरोप त्यांनी केला.

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

‘स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी हे आंदोलन चालवले जात आहे,’ अशी टीका रहांगडाले यांनी केली. तसेच मराठा आरक्षणाशी संबंधित मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, असेही त्यांनी म्हटले.

अंतरवाली सराटीत उपोषणाची तयारी पूर्ण

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी अंतरवाली सराटीत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. काही राजकीय नेत्यांनीही जरांगे यांची भेट घेतली आहे.

मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती

दरम्यान, ‘आता मागे हटणार नाही’, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा समाजाच्या सापडलेल्या नोंदींच्या आधारे संबंधितांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप

एकीकडे जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाची सरकारकडून काय भूमिका घेतली जाते आणि त्यावर पुढील राजकीय घडामोडी काय होतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vijay rahangdale criticizes manoj jarange maratha reservation protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • BJP
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस
1

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी
2

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत
3

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
4

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.