Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती

मराठा-कुणबी आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटीत उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.

  • By विवेक
Updated On: Aug 28, 2026 | 02:28 PM
मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती

मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे अंतरवाली सराटीत उपोषण करणार.
  • मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येण्याचा इशारा.
  • ग्रामीण भागात जीआर न पोहोचल्याची प्रसाद लाड यांची कबुली.
 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. यंदा मुंबईत आंदोलन न करता अंतरवाली सराटीतच उपोषण करण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतल्याची माहिती भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली. मात्र, सरकारकडून मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मुंबईत येण्याचा इशारा कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘अंतरवाली सराटीत उपोषण करण्याचा निर्णय’

रक्षाबंधनानिमित्त भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते राखी बांधल्यानंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या आगामी आंदोलनाबाबत भाष्य केले. मुंबईत सणासुदीचा काळ सुरू असून पुढे गणेशोत्सव, दहीहंडी यांसारखे मोठे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये, अशी विनंती आम्ही केली होती. त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवत अंतरवाली सराटीत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे लाड म्हणाले.

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने; वडेट्टीवारांच्या माफीनंतर वादावर पडदा?

दरम्यान, सरकारने मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात काढलेले काही जीआर ग्रामीण भागातील प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचले नसल्याची कबुलीही लाड यांनी दिली. विभागांमध्ये समन्वयाचा अभाव राहिल्यामुळे काही ठिकाणी अंमलबजावणीत अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक’

‘चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी भूमिका लाड यांनी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असून त्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करतील, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला.

Congress Internal Conflict: राहुल गांधींच्या मेहनतीवर ‘घरभेद्यां’चा सुरुंग! अंतर्गत गटबाजीने काँग्रेस संकटात

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चेवरही लाड यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारने मागील काही महिन्यांत आरक्षणासंदर्भात आवश्यक ते निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला.

 

Web Title: Manoj jarange maratha kunbi reservation prasad lad mumbai protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Prasad Lad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.