
Manoj Jarange Patil Antarwali Sarati Protest 29 August
२९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे आंदोलन होणार असल्याचे सांगत सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मुंबईकडे कूच करण्यात येईल आणि लाखो गाड्या मुंबईत जातील, असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाकडून अर्ज येत नसल्याचे म्हटल्याचा संदर्भ देत जरांगे पाटील म्हणाले की, सरकार आणि अधिकाऱ्यांनी आमचे अर्ज स्वीकारले नाहीत आणि आता त्यालाच उदासीनता असल्याचे सांगितले जात आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत, तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा सर्वांनी अंतरवाली सराटी येथे येऊन अर्ज द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाजाने घरात बसू नये, मरगळ झटकून एकत्र यावे, असे आवाहन करत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. निवड झाल्यानंतरही नियुक्ती न मिळालेल्या मराठा तरुणांनीदेखील अंतरवालीत येऊन अर्ज द्यावेत, असे त्यांनी सांगितले.
जात प्रमाणपत्राच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी अंतरवाली सराटीत येऊन प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी, तहसीलदार, एसडीएम आणि जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना एकत्र बसवून हा प्रश्न सोडवण्याची मागणी आपण केली होती; मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाच्या दिवशी कुलदेवतेला राखी बांधण्याची काय आहे पद्धत, जाणून घ्या
राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यावर टिका करत मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा उपसमितीच्या कामकाजावरही जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. “विखे पाटलांवर खूप अपेक्षा होत्या; मात्र ते काहीच काम करत नाहीत. एवढा माज चांगला नाही. विखे पाटील यांना मराठा समाजाच्या प्रश्नांची माहिती नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. प्रसाद लाड आणि उदय सामंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाऊन मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करून घ्यावी, असेही जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले आहेत, हे आपण नाकारत नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाचे नुकसानही होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “फडणवीस आणि शिंदे, मराठ्यांच्या लेकरांचा तळतळाट घेऊ नका,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच मराठा समाजातील कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या करू नये, असे आवाहन करत त्यांच्या प्रश्नांसाठी आपण ठामपणे लढत असल्याचे त्यांनी सांगितले.