
महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये खुला प्रवर्गासाठी आरक्षण
पुणे : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यानंतर आता महापौरपदावर कोण याची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. महानगरपालिका संस्थांमधील महापौरपदांसाठीची सोडत गुरुवारी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र नगरविकास विभागाने एक आदेश जारी केला आहे की, हे राज्य सचिवालय (मंत्रालय) येथे काढण्यात येईल. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये खुला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
लॉटरीमध्ये महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव ठेवले जाईल हे निश्चित केले जाईल, जसे की सर्वसाधारण प्रवर्ग, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग. एकदा श्रेणी जाहीर झाल्यानंतर, पात्र उमेदवार त्यांचे अर्ज दाखल करतील. भाजप, शिवसेना, शिवसेना उबाठा आणि काँग्रेससह सर्व पक्ष लॉटरीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये खुला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
हेदेखील वाचा : Pune ZP Election : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस–वंचितची अधिकृत आघाडी; भाजपविरोधात एकत्र लढणार
दरम्यान, मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, भिवंडी, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, अमरावती, वसई विरार, परभणी, नांदेड, सांगली, मालेगाव, सोलापूर आणि धुळे येथे सर्वसाधारण गटाचा महापौर असेल.
मुंबईचा महापौर कोण होणार याची उत्सुकता
मुंबईचा महापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मागील 25 वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे मुंबईवरील सत्ता गेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भाजपचा महापौर होण्याची मोठी शक्यता आहे. यामध्ये मात्र एकनाथ शिंदे यांनी हॉटेल पॉलिटिक्सचा डाव खेळल्यामुळे रंगत वाढली आहे. यामध्ये आता आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. १७ पैकी ९ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर विराजमान होईल. सगळ्यांचं लक्ष लागलेली मुंबई महापालिकेसाठी खुल्या प्रवर्गातील आरक्षण सोडतीत निघाले. मुंबईमध्ये सर्वसाधारण गटातील महिला महापौर होणार आहे.
हे देखील वाचा : राजकीय घडामोडींना वेग! KDMC शिंदे सेना अन् मनसेच्या युतीने ठाकरेसेना नाराज, संजय राऊत शिवतीर्थावर दाखल