Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “दादा जीवनातील रंगच घेऊन गेले…”; होळीच्या दिवशी अमोल मिटकरींची भावनिक पोस्ट

Amol Mitkari : अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय घेतला जात असताना त्यांच्या पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी होळीनिमित्त भावनिक पोस्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 02, 2026 | 01:16 PM
MLA Amol Mitkari makes social media post for Ajit Pawar on Holi festival

MLA Amol Mitkari makes social media post for Ajit Pawar on Holi festival

Follow Us
Follow Us:

अजित पवारांच्या आठवणीमध्ये होळी
अमोल मिटकरी यांची खास सोशल मीडिया पोस्ट
मिटकरींनी व्यक्त केला अपघातावर संशय

Amol Mitkari Social Media Post : बारामती : दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचे महिनाभरापूर्वी विमान अपघातामध्ये निधन झाले. हा अपघात होता की घातपात होता यावरुन राजकारण रंगले आहे. अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय घेतला जात असताना त्यांच्या पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भावनिक पोस्ट केली आहे. अमोल मिटकरी यांनी होळीच्या मुहूर्तावर अजित पवारांशिवाय होळी कशी साजरी करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान क्रॅश झाले. यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. VSR कंपनीच्या विमानाचा हा अपघात झाला असून यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी देखील आक्रमक भूमिका घेत संशय व्यक्त केला आहे. पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अजित पवारांची अकाली एक्झिट ही धक्कादायक होती. यानंतर आता होळी सणावर देखील शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा : VSR च्या मालकांची विमानामध्ये डुलकी; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

होळीच्या सणानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा देत खास पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “आदरणीय दादा जीवनातील रंगच घेऊन गेले …या वर्षीची होळी फक्त राख आणि आठवणींची धग आहे. ज्यांच्या नेतृत्वाने आयुष्य रंगले, त्यांच्याविना उत्सव कसा साजरा करायचा? म्हणून आता होळी नाही #बेरंग होळी मीस यू दादा,’ अशी सोशल मीडिया पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे.

आदरणीय दादा जीवनातील रंगच घेऊन गेले …
या वर्षीची होळी फक्त राख आणि आठवणींची धग आहे.
ज्यांच्या नेतृत्वाने आयुष्य रंगले, त्यांच्याविना उत्सव कसा साजरा करायचा?
म्हणून आता होळी नाही —#बेरंग होळी 🥹 miss u Dada pic.twitter.com/OUi5ckKRcV
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 2, 2026

हे देखील वाचा :  इराणवरील हल्ल्यामुळे भारतात हिंसाचार भडकणार? गृह मंत्रालयाकडून ‘या’ राज्यात अलर्ट जारी

त्याचबरोबर मीडिया रिपोर्टनुसार,अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या मृत्यूवर संशय देखील व्यक्त केला. ते म्हणाले की, “विमान अपघात प्रकरणी तपास कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचता येत नाही. हवामान खराब असल्याचे कारण पटत नाही. विमान रडारवरुन अचानक गायब झालं. लॅंडिंग गेअरसोबत छेडछाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. इंधनात काही घटक समाविष्ट होते का? या विमानाचे पायलट सुमित कपूर जीवंत असल्याची माहिती समोर येत आहे. ते कॅलिफोर्नियात असल्याची माहिती मिळत आहे. सुमित कपूर हा जीवंत असेल तर DGCA ने आधी सहा माणसे विमानात होती सांगितली त्यानंतर पाच जणांचे मृतदेह आढल्याचे सांगितले. याचा अर्थ सुमित कपूर विमानामध्ये नव्हता आणि शांभावी पाठक विमान चालवत होती का?” असे अनेक प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: Mla amol mitkari makes social media post for ajit pawar on holi festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • amol mitkari
  • baramati news

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! सुपे घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस उलटली; 4 विद्यार्थी जखमी
1

मोठी बातमी ! सुपे घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस उलटली; 4 विद्यार्थी जखमी

Baramati News: ‘मित्र वणव्यात गारव्यासारखा’! अनंत राऊत यांच्या कवितांनी बारामतीकरांच्या मनाला घातली साद
2

Baramati News: ‘मित्र वणव्यात गारव्यासारखा’! अनंत राऊत यांच्या कवितांनी बारामतीकरांच्या मनाला घातली साद

बारामती लोकअदालतीत 5627 प्रकरणे निकाली; 6.44 कोटींची मोठी वसुली
3

बारामती लोकअदालतीत 5627 प्रकरणे निकाली; 6.44 कोटींची मोठी वसुली

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’
4

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.