Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati by-election : “वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर…; बारामती पोटनिवडणूकीवर रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Baramati by-election : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी भावनिक पोस्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 16, 2026 | 11:14 AM
MLA Rohit Pawar Emotional Post for Baramati By-election 2026

MLA Rohit Pawar Emotional Post for Baramati By-election 2026

Follow Us
Follow Us:
  • बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक जाहीर
  • अजित पवारांनंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक
  • आमदार रोहित पवार यांची भावनिक पोस्ट
Baramati by-election :  बारामती : केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये देशातील पाच राज्यांसह पोटनिवडणूकांची देखील घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. राज्यातील बारामती मतदारसंघ (Baramati News) आणि राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीवर दुखाची झळ पसरली आहे. यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर येत्या 4 मे रोजी निकाल हाती येणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होताच आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली.. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं..!,” अशा भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली.. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक… — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 15, 2026

हे देखील वाचा : बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान अन् निकाल

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याची सुत्रे हाती घेतली. तर पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. यानंतर आता निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

हे देखील वाचा : बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार? पोटनिवडणूक बिनविरोध होणार की लढणार?

ही बारामती आणि राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे महायुतीचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीप्रमाणे कोणताही नेता वारल्यानंतर त्याच्या जागी होणाऱ्या पोटनिवडणूकीमध्ये विरोधी पक्षाकडून उमेदवार दिला जात नाही.महाराष्ट्राची हीच राजकीय संस्कृती पुढे चालवली जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार गट कोणताही उमेदवार देणार नाही अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शरद पवार गट हा बारामती विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार देणार नसल्याचे देखील समोर आले आहे.

Web Title: Mla rohit pawar emotional post for baramati by election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका
2

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी  सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना  पालिकेकडे हस्तांतरित
3

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना पालिकेकडे हस्तांतरित

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
4

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.