मंत्री संजय शिरसाट (फोटो- सोशल मीडिया)
मंत्री संजय शिरसाट यांचे पवारांच्या अपघातावर भाष्य
राजकीय गोष्टींवर मांडले आपले स्पष्ट मात्र
भिवंडी महापौर निवडणुकीबाबत देखील केले भाष्य
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात, रोहित पवार, गणेश नाईक आणि राज्यातील अनेक विविध विषयांवर संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले ते जाणून घेऊयात.
मंत्री संजय शिरसाट अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवर बोलताना म्हणाले, “अजित पवार यांचा दुर्दैवी अपघात झाला. त्या घटनेचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारीच्या आधी येण्याची शक्यता आहे. अहवाल आल्यावरच हा घात आहे की अपघात यावर भाष्य करणे योग्य होईल. या घटनेबाबत अनेक शंका आणि आरोप उपस्थित केले जात आहे. मात्र अहवाल आल्यावर सर्वकाही स्पष्ट होईल.”
पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “रोहित पवार यांच्या जिवास धोका असेल तर त्यांनी सुरक्षेसाठी अधिकृत मागणी केली पाहिजे. शासनाकडे यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. धोका असल्याचे यंत्रणेसमोर स्पष्ट झाले तर त्यांना संरक्षण दिली जाईल. यात कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही.”
संजय शिरसाट पुढे म्हणाले, “कॉँग्रेस आणि उतथाव ठाकरे यांच्या पक्षाचा पाठिंबा असेल तर शरद पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. आदित्य ठाकरे यांनी संख्येनुसार जागा आमची असल्याचे म्हटले असले तरी सध्याच्या गणितानुसार, इतरांचा पाठिंबा आवश्यक असणार आहे.”
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!
भिवंडी महापौर निवडणूकीवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “स्थानिक राजकारणाची सखोल माहिती नसल्याने ट्विस्ट निर्माण झाला आहे. सध्याच्या राजकारणात कोण कोणाशी युती करेल हे सांगता येत नाही. सोलापूरमध्ये महिला अधिकाऱ्यावर गाडी घालणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्कासारखी कठोर कारवाई झाली पाहिजे.
तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा
बारामती शहरातील नटराज नाट्यकला मंडळाच्या वास्तू समोर असलेल्या तिरंगा चौकात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दहा फूट उंचीचा व दीड वजनाचा पूर्ण कृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अजितदादा यांच्या संकल्पनेतूनच बारामती शहरातील हे नटराज नाट्य कला मंडळाचे कलादालन उभारण्यात आले आहे. त्यांच्या सूचनेनुसारच या ठिकाणी ३० मीटर उंचीचा तिरंगा राष्ट्रध्वज उभारून या चौकाला तिरंगा चौक हे नाव देण्यात आले आहे.






