MNS Raju Patil thanks to kunal kamra and share new video
मुंबई : राज्यामध्ये रोज नवीन मुद्द्यावरुन राजकारण तापले आहे. दोन दिवसांपूर्वी कॉमेडियन कुणाल कामरा याने वादग्रस्त कविता केली. कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली. मात्र यामुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा याचा स्टुडिओ फोडला. तसेच कुणाल कामरा याला आता समन्स देखील बजावण्यात आले आहे. मात्र आता कुणाल कामराचे मनसे नेत्यांनी धन्यवाद मानले आहेत.
कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेंवर टीका केल्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला होता. त्याच्यावर महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. अगदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील टीका केली. महायुतीच्या नेत्यांनी कुणाल कामरावर जोरदार टीका केली तर ठाकरे गटाने कामराच्या बाजूने पवित्रा घेतला. सुषमा अंधारे यांनी कुणालची कविता पुन्हा एकदा गाऊन दाखवली. यामुळे दोघांवर विधीमंडळामध्ये हक्कभंग दाखल केला आहे. कुणाल कामराचे आता मनसे नेते राजू पाटील यांनी धन्यवाद मानले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे नेते राजू पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी कुणाल कामरा याची एक व्हिडिओ शेअर केली आहे. यामध्ये तो नागरी प्रश्नांवरुन सरकारवर जोरदार टीका करत आहेत. राजू पाटील यांनी कुणाल कामरा याचे धन्यवाद देखील मानले आहेत. राजू पाटील यांनी लिहिले आहे की, धन्यवाद कुणाल कामरा, आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल ! अशी पोस्ट राजू पाटील यांनी केली आहे.
धन्यवाद @kunalkamra88 , आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल ! #बिल्डरांची_मेट्रॅा #MMRDA #MSRDC #टक्केवारी #kunal_kamra pic.twitter.com/R7smgHaymm
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 26, 2025
मनसे नेते राजू पाटील यांनी कुणाल कामरा याची एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो पुन्हा एकदा कवितेमध्ये डोंबिवलीची व्यथा मांडत आहे. कुणाल कामराने म्हणत आहे की, इन सडकों की बरबादी…करने सरकार हे आयी…मेट्रो हैं इनके मन में…खोल कर ये ले अंगडायी…ट्राफिक बढाने ये हैं आयी…ब्रीजेस गिराने हैं ये आयी…कहेंते हैं इसको…तानाशाही…और कुछ फरक पडता नहीं है इनको…तुमच्या इच्छा आकांशा कचऱ्याच्या डब्ब्यात गेल्या. कॉरपोरेट कामगार हा कॉरपोरेट कंपनीपेक्षा जास्त टॅक्स भरतो आहे, असा घणाघाती टोला कुणाल कामरा याने आपल्या व्हिडिओमध्ये लगावला आहे. कुणाल कामराचा याचा नवीन सरकारवरील टीकेचा व्हिडिओ राजू पाटील यांनी शेअर केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा