Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : पोटनिवडणुकीच्या प्रचाराने पवार कुटुंब एकत्र येणार? सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार उतरले मैदानात

Naharashtra Politics : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी सुनेत्रा पवार या बिनविरोध उमेदवार आहेत. मात्र काकींसाठी रोहित पवार स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2026 | 01:36 PM
MP Rohit Pawar Outreach Visits for Sunetra Pawar Campaign Baramati By-election 2026

MP Rohit Pawar Outreach Visits for Sunetra Pawar Campaign Baramati By-election 2026

Follow Us
Follow Us:

Rohit Pawar in Baramati by election : बारामती : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Baramati by-election) जाहीर झाली आहे. अजित पवारांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी हाती कारभार घेतला. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या कारभार सांभाळत आहेत. याचबरोबर बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अजित पवारानंतर सुनेत्रा पवार या बारामतीच्या नेत्या असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे काकींच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

 

बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही बिनविरोध होणार आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसने दिलेला उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर कोणत्याही राजकीय पक्षाचे आव्हान नसल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर अजिक पवारांच्या निधनामुळे या निवडणुकीला दुखाची किनार आहे. बारामतीकरांचा पवार कुटुंबावरील विश्वास व स्नेह हा सुनेत्रा पवार यांन बहुमतांनी निवडून देणार आहे.मात्र तरी निवडणुकीच्या प्रचारासाठी रोहित पवारांनी शुभारंभ केला आहे.

हे देखील वाचा : AAP खासदार अशोक मित्तल EDच्या रडारवर, राघव चढ्ढा यांच्याऐवजी राज्यसभेत झाली उपनेतेपदी नियुक्ती

अजित पवार हे बारामतीचा प्रचार नेहमी बारामतीत कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवूनच करत असत. हीच परंपरा कायम ठेवत रोहित पवार यांनी देखील मारुतीराय, दत्त महाराज आणि महादेवाचं दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली. याचबरोबर रोहित पवार यांनी भेटीगाठी घेऊन मतदारांना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. रोहित पवार यांनी कोपरसभा, भेटी आणि चौकसभा यांचा धडाका लावला आहे. रोहित पवारांनी अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या काटेवाडीमध्ये देखील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची घोंगडी बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच दुर्दैवाने लागलेल्या या निवडणुकीत अजितदादांना श्रद्धांजली म्हणून सुनेत्राकाकी यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचं आवाहन केले.

बारामती पोट निवडणुकीत सुनेत्राकाकी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने काटेवाडीत विविध ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची घोंगडी बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि दुर्दैवाने लागलेल्या या निवडणुकीत अजितदादांना श्रद्धांजली म्हणून सुनेत्राकाकी यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचं… pic.twitter.com/H3nb6lqtJR — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 15, 2026

हे देखील वाचा :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; कोयना जलाशयावरील पुलांची केली पाहणी

शरद पवार गटाकडून उमेदवार न देण्याचा निर्णय

बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी उमेदवार न देण्याची घोषणा केली होती. घरातील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे शरद पवार गटाने हा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले होते. मात्र आता अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला.याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांसाठी प्रचार देखील सुरु केला आहे.

 

Web Title: Mp rohit pawar outreach visits for sunetra pawar campaign baramati by election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Baramati by-election
  • rohit pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
1

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
2

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय
3

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.