खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामती पोटनिवडणूकिवर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
अजित पवारांच्या निधनामुळे बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार यांनी काकाविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार गटाने माघार घेतली आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेला महाविकास आघाडीमधून तीव्र विरोध होताना दिसत आहे. यानंतर काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य नेत्यांनी केले आहे. या भूमिकेला खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे.
हे देखील वाचा :महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अनेक राजकीय भाष्य करत शरद पवार गटावर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून बारामती व राहुरी दोन्ही निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बारामतीच्या जागेवर शरद पवार गटाचा अधिकार आहे. या संदर्भात त्यांच्याशी आमची चर्चा होईल. या जागेबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे बारामती विधानसभेची निडवणूक होत आहे. कौटुंबिक धर्म म्हणून शरद पवारांचा पक्ष कदाचित ही निवडणूक लढणार नाही. इतर लढतील तर त्यांना विरोधी करता कामा नये. कारण शेवटी लोकशाही आहे. एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली.
हे देखील वाचा : तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन
जळगाव दौऱ्यावर असलेले राऊत म्हणाले की, जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. शेती उद्ध्वस्त झाली आहे. कुठे आहेत गिरीश महाजन? ज्यांना संकट मोचक म्हणतात ना? शेतकऱ्यांच्या संकटावेळी हे संकटमोचक कुठे असतात? ते फक्त राजकीय संकटमोचक आहेत का? शेतकऱ्यांवर संकट येतात तेव्हा हे संकटमोचक काय करताना दिसत नाही. फक्त आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे, पक्ष फोडणे, हेच फक्त संकटमोचकाचे कर्तव्य आहे का? असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे.






