Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Shivsena Alliance : भाजप अन् शिवसेना पुन्हा एकत्र येणार? युतीसंदर्भात हालचाली सुरु? खासदार राऊतांनी स्पष्टच सांगितलं

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही युतींमध्ये कुरबुर सुरु आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना हे पक्ष पुन्हा एकदा युती करुन एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर खासदार संजय राऊतांनी सूचक विधान केले.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 30, 2025 | 12:08 PM
mp sanjay raut talk about bjp and shivsena alliance in maharashtra politics

mp sanjay raut talk about bjp and shivsena alliance in maharashtra politics

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीला एकतर्फी यश मिळाले असले तरी पालकमंत्रिपद आणि खातेवाटपावरुन नेते नाराज आहेत. तर निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील मित्रपक्ष एकमेकांवर नाराज आहेत. यामुळे राज्यामध्ये नवीन आघाडी पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना व भाजप पक्षाची पुन्हा एकदा राज्यामध्ये युती होण्याचे संकेत समोर येत आहेत. या संदर्भात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील युतीवर भाष्य केले. मागील काही दिवसांपासून भाजप व शिवसेना नेत्यांची जवळीक वाढत आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. भाजप व शिवसेनेमध्ये प्रचारामध्ये झालेल्या तफावत आता नरम होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यामध्ये त्यामुळे नवीन आघाडी निर्माण होण्याबाबत संजय राऊतांनी सूचक विधान केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्किल करा

भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात एका लग्न समारंभात कुजबुज झाली होती. त्यानंतर शिवसेना-भाजप युती झाली म्हणजे तो सुवर्णक्षण असेल, असे उत्तर भाजप नेते चंद्रकांत पाटील दिले होते. त्यामुळे आता शिवसेना उबाठा आणि भाजप एकत्र येणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला. त्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील आमचे मित्र आहेत. युतीचे समर्थक आहेत. शिवसेना-भाजप युतीसंदर्भात विचार करणारी जी जुनी पिढी होती, त्यात चंद्रकांत पाटील आहेत. परंतु भाजपमध्ये नवीन बाहेरुन आलेले हवसे-नवसे लोकांना शिवसेना-भाजप युतीचे महत्व माहीत नाही. आम्ही एकत्र २५ वर्ष चांगले काम केले. नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले काम झाले,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी अगदी एकमेकांविरोधात भूमिका घेतली होती. आता निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमधील शत्रूत्व कमी झाल्याचे दिसून येत आहे. ही युती तोडण्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की,” दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजपमधील दरी वाढली. आम्ही मविआत भाजपमधील काही लोकांच्या हट्टामुळे गेलो. त्या लोकांमुळे २५ वर्षांची युती तुटली. आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रीपदाचा दावा तुम्ही एकनाथ शिंदे यांना दिला. आम्ही तेव्हा हिच मागणी केली होती. परंतु अमित शाह यांनी ही ती मागणी नाकारली. कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडायची होती. आता पुन्हा अनेक लोकांना भाजप-शिवसेना युती होऊ शकते, असे वाटत होते. आता येत्या काळात काही घडमोडी घडणार आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेना उबाठामधील अनेक लोकांना युती व्हावी,” असे वाटते, असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Web Title: Mp sanjay raut talk about bjp and shivsena alliance in maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • BJP
  • sanjay raut
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

भाजपचा ‘शिंदे पॅटर्न’ सोलापुरात? विधानपरिषदेसाठी महिला चेहऱ्याला संधीची जोरदार चर्चा; अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीवर सस्पेन्स कायम
1

भाजपचा ‘शिंदे पॅटर्न’ सोलापुरात? विधानपरिषदेसाठी महिला चेहऱ्याला संधीची जोरदार चर्चा; अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीवर सस्पेन्स कायम

Gopichand Padalkar: हर्षवर्धन सपकाळ यांचे डोके सडलेल्या कांद्यासारखे आहे; भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची विरोधकांवर तोफ
2

Gopichand Padalkar: हर्षवर्धन सपकाळ यांचे डोके सडलेल्या कांद्यासारखे आहे; भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची विरोधकांवर तोफ

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून घंटानाद आंदोलन
3

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून घंटानाद आंदोलन

Matoshree call to Devendra Fadnavis: ‘मातोश्री’वरून थेट देवेंद्र फडणवीसांना फोन अन् झटका एकनाथ शिंदेंना
4

Matoshree call to Devendra Fadnavis: ‘मातोश्री’वरून थेट देवेंद्र फडणवीसांना फोन अन् झटका एकनाथ शिंदेंना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.