
MP Sanjay Raut live press confernce on maharashtra elections 2026
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊतांनी आयोगाच्या या निर्णयावर टीका केली. खासदार संजय राऊत म्हणाले की, “आता निवडणुकीसाठी प्रचार संपला आहे काल. मात्र निवडणूक आयोग यांनी सत्ताधारी यांना एक वेगळी मुदत दिली आहे. एकदा प्रचार संपला तर प्रचार संपायचा पण आता काय तरी वेगळ चालू आहे. घरोघरी पैशांचे वाटप करण्यात येत आहे. साडी वाटप करण्यात येत आहे. साडीमधून किंवा वर्तमानपत्रातून पैशांचे वाटप होत आहे,” असा गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केला आहे.
हे देखील वाचा : “विकासाचा अजेंडा नसल्याने मारझोड आणि तोडण्याची भाषा” शायना एन.सी यांची उद्धव व राज ठाकरेंवर टीका
महायुतीकडे घोटाळ्याचे पैसे
पुढे राऊत म्हणाले की, “हिंदू मुस्लिम अशी हा निवडणूक आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि दुबार मतदार सापडला तर त्याला ठोका असा आव्हान केला आहे, असा मोठा दावा खासदार राऊतांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, पैसे शिंदे गटाकडे आहे, भाजप कडे आहे, अजित पवार गटाकडे त्यांच्याकडे घोटाळ्यामुळे पैसे आहेत. अजित पावर सांगत आहे माझ्या कडे एक फाईल आली आहे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यापासून लपवू नका. आज मकरस्क्रांती आहे अजित पवार यांचा तोंडात गोड पडो…जे विरोधक त्यांना हे शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला,” असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व संपेल का…? फडणवीसांचे रोखठोक उत्तर
महाराष्ट्रामध्ये नियम आणि कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन
पुढे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना मराठी माणसांच्या बद्दल काय माहीत आहे. वडापाव आता महाराष्ट्राचा ब्रँड आहे, तुम्हां पोटात दुखतंय काय ? तुम्ही दिल्लीला अटल हॉटेल उघडला आणि मग तो हे बंद पडला आहे. वडापावचा मजाक उडवू नका फडणवीस. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा हिंदू मुस्लिम डाव फेल झाला आहे. निवडणूक आयोगाच्या समोर महाराष्ट्रामध्ये नियम आणि कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन केले जातंय .हरामाच्या पैसा वाटप केलं जातोय.आता मराठी माणसांनी हरामाचा पैसा घ्यावा हे मराठी माणसांनी ओळखावं. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस धमकी देत आहे जर आम्हाला सोडून दुसरी कडे गेले तर काय होऊ शकतो असा इशारा देत आहे,” अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे.