mp sanjay raut reaction on raj thackeray and uddhav Thackeray alliance in mumbai elections 2025
मुंबई : पहलगाममध्ये येथे झालेल्या हल्ल्याचे भारताने सडेतोड उत्तर द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यामध्ये 27 निष्पाप लोकांची हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच ही वेळ नरेंद्र मोदी यांच्या राजकीय संन्यासाची असल्याचे देखील खासदार राऊत म्हणाले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थिती लावली, यावरुन खासदार राऊत म्हणाले की, “देशातील घराघरामध्ये रोष व्यक्त केला जात आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येऊन फिल्मी नट-नट्यांसोबत 9 तास वेळ घालवतात. ते बिहारच्या प्रचारामध्ये दंग आहेत. त्यांच्यावर चेहऱ्यावर चिंतेचे एक रेष दिसत नव्हती. याचे श्रेय सुद्धा भारतीय सैन्याला दिले पाहिजे. कारण ते तिथे मरण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे पंतप्रधान फिरत आहेत. मात्र हे सरकार खोकले आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“त्याचबरोबर अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. मात्र सरकार वारंवार 10 वर्षांमध्ये चुका करत आहे. त्या चुकांचे समर्थन होऊ शकत नाही. युद्ध करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे असते. जे होईल ते सहन करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे भूमिका घेतात त्याला नेतृत्व म्हणतात. नाही तर तुम्ही लढा आम्ही पूर्ण मोकळीक दिली आहे, श्रेय मी घेणार आणि गडबड झाली तर तुम्ही केली, याला राजकीय नेतृत्व म्हणत नाहीत. 1971 चे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये झालेले युद्ध आम्ही पाहिले आहे. अशा प्रकारचे आक्रमक पवित्रा आता कुठेही दिसत नाही. देशामध्ये नेतृत्वाची समस्या आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विरोधकांनाही आमचा विरोध
मुंबईमध्ये वेव्हज परिषदेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावरुन खासदार संजय राऊत आक्रमक झाले. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नट-नट्यांसोबत वेळ घालवत बसले. अशा प्रकारच्या हल्ल्यानंतर 15 दिवसातील असे कार्यक्रम रद्द केले पाहिजे होते. यावेळी फक्त देशाचा आणि देशाच्या सुरक्षेचा विचार करायला हवा होता. काश्मीरचा विचार करायला हवा होता. परंतू आपले नेतृत्व हे काहीही करत नाही. आणि आपले विरोधक सरकारला पाठिंबा देत आहेत. यासाठी आमचा विरोध आहे,” अशी आक्रमक भूमिका खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजप आणि विरोधी कॉंग्रेस विरोधात घेतली आहे.