सौजन्य - नवराष्ट्र टीम
याबाबतचे निवेदन बारामतीकरांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याच्या घटनेला येत्या २८ फेब्रुवारीला १ महिना पूर्ण होत आहे. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी ठरलेल्या अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघातामुळे जनतेच्या मनात तीव्र दुःख, अस्वस्थता आणि अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बारामतीकर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची कधीही न भरून येणारी हानी असून, या दुःखातून सावरणे सर्वांसाठी अतिशय कष्टाचे होऊन बसले आहे. महाराष्ट्राचे विकास पुरुष असणारे अजितदादा यांचे पुढील विकासाचे मोठे पाऊल टाकण्यापूर्वीच संशयास्पदरितीने विमान अपघातात अवेळी मृत्यु होणे ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी अविश्वसनिय असून, याची सखोल चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच सदर चौकशी प्राधान्याने फास्ट ट्रॅक पद्धतीने पूर्ण करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यात यावी, अशा घटना पुन्हा घडू नये, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या आंदोलनानंतर तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह महिला देखील मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
हे सुद्धा वाचा : सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात
आमदार रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
या अपघाताची किंवा घातपाताची सखोल चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि डीजीसीए यांच्याकडे आमदार रोहित पवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरील उच्च व्यक्तीचा अपघात किंवा घातपात होऊ शकतो याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणारे एकमेव आमदार रोहित पवार हे आहेत. ते या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत असून, ती लोकांपर्यंत पोहोचवत असल्यामुळे त्यांच्या जिवितासही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना, झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी बारामतीकरांच्या वतीने करण्यात आली.






