
शिंदेंची मागणी, भाजपची चुप्पी! मुंबईच्या महापौराबाबत ४८ तासांनंतरही पेच कायम; तर 'उबाठा'ची सावध भूमिका (Photo Credit- X)
बीएमसी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महापौर कोणाचा होणार, यावरून राजकारण तापले आहे. नियमानुसार, लॉटरीमध्ये जे आरक्षण निघेल, त्याच प्रवर्गातील नगरसेवक महापौर बनू शकतो. उदाहरणार्थ, जर मुंबईचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर त्याच प्रवर्गातील उमेदवार महापौरपदाच्या खुर्चीवर बसेल. राज्यातील इतर २८ महापालिकांनाही हाच नियम लागू असेल.
‘उबाठा’ नेते संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर मुंबईत बसेल, तो दिवस मुंबईसाठी शोकाचा असेल, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. आरक्षण जाहीर करण्यास जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांनीही या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, निवडणूक निकालापूर्वीच आरक्षण जाहीर होण्याची परंपरा मोडल्याची टीका केली आहे.
BMC महापौर पदासाठी भाजपनेही खेळला डाव! सावध भूमिका घेत नगरसेवकांना दिल्या खास सूचना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे २९ नवनिर्वाचित नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून वांद्रे येथील ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलमध्ये आहेत. शिंदे गट अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.
दुसरीकडे, भाजपने शिंदे गटाच्या अडीच वर्षांच्या मागणीचा इन्कार केला आहे. मुंबई भाजप सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले की, महापौर महायुतीचाच असेल यात शंका नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्रितपणे अंतिम निर्णय घेतील. राऊत यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये असण्याच्या दाव्यात तथ्य नाही, ते सर्व एका कार्यशाळेत आहेत.”
उबाठाने स्वतःला या सत्तासंघर्षापासून दूर ठेवले आहे. प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांनी त्यांच्या लढाया स्वतः लढाव्यात, आम्हाला यात ओढू नका.
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप! ‘उबाठा’चे नगरसेवक फुटणार? नेमका विषय काय?