Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : ‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी

NEET प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील मुंबईतील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले FIR मागे घेण्याची मागणी मुंबई युवक काँग्रेसने केली आहे. रिया अहिरला सोशल मीडियावर धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पोलीस सहआयुक्तांकडे करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Aug 20, 2026 | 08:49 PM
‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी

‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी

Follow Us
Follow Us:
  • NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व FIR मागे घेण्याची युवक काँग्रेसची मागणी.
  • रिया अहिरला सोशल मीडियावर धमक्या देणाऱ्यांची ओळख पटवून कारवाई करण्याची मागणी.
  • महिला कंटेंट क्रिएटर्सना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी.
मुंबई : NEET परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासोबतच आंदोलनात सहभागी झालेल्या रिया अहिर या तरुणीला सोशल मीडियावर धमक्या देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही पोलिसांकडे करण्यात आली.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सरचिटणीस सुरभी द्विवेदी, ॲड. ऋषभ रंजन आणि हरगुन सिंग यांच्या शिष्टमंडळाने पोलीस सहआयुक्तांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांवरील गुन्हे आणि रिया अहिरला मिळणाऱ्या कथित धमक्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

झीनत शबरीन यांच्या म्हणण्यानुसार, शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनादरम्यान रिया अहिर ही युवाशक्तीचे प्रतीक म्हणून समोर आली. तिच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला FIR तसेच आंदोलनात सहभागी इतर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली.

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार

दरम्यान, रिया अहिर आणि मुस्कान कन्नौजिया यांसारख्या महिला कंटेंट क्रिएटर्सना सोशल मीडियावर कथितरित्या बलात्काराच्या धमक्या आणि ऑनलाइन छळ केला जात असल्याचा दावा युवक काँग्रेसने केला आहे. अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

Met the Joint Commissioner of Mumbai Police along with @Rhiyahir and Muskan Kanaujia, two brave young voices who emerged at the forefront of Mumbai’s student protest. We demanded withdrawal of FIRs against Rhiya and innocent students, and strict action against those issuing rape… pic.twitter.com/XMj0opOUqG — Zeenat Shabrin (@ShabrinZeenat) August 19, 2026

युवक काँग्रेसच्या माहितीनुसार, २७ वर्षीय रिया अहिर गेल्या काही वर्षांपासून अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. तिने धमक्यांबाबत सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आला.

पोलीस सहआयुक्तांनी धमकी देणाऱ्यांची ओळख पटवून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे झीनत शबरीन यांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई कधी होते आणि आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR संदर्भात काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला धक्का! संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटेंची ठाकरे गटात एन्ट्री; धाराशिवच्या राजकारणात खळबळ

Web Title: Mumbai neet protest students fir withdraw youth congress police commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Congress
  • Mumbai News
  • neet paper leak
  • Student Protest

संबंधित बातम्या

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra
1

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
2

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव
3

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
4

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.