Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought : ’99 टक्के भागात दुष्काळाची स्थिती’; नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Maharashtra Drought : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 99 टक्के भागात दुष्काळ असून तातडीने पंचनामे, सरसकट कर्जमाफी आणि भरीव मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

  • By विवेक
Updated On: Sep 26, 2026 | 08:29 PM
Nana Patole

Nana Patole

Follow Us
Follow Us:
  • ’75 टक्के नव्हे, 99 टक्के भागात दुष्काळ’; नाना पटोलेंचा दावा
  • तातडीने पंचनामे करून सरसकट कर्जमाफी आणि भरीव मदतीची मागणी
  • ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरूनही नाना पटोलेंनी उपस्थित केले गंभीर सवाल
 

Maharashtra Drought : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेतीचं मोठं नुकसान झाल्याचा दावा करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दुष्काळ जाहीर करण्यास सरकारने उशीर केल्याचा आरोप करताना, केवळ 75 टक्के नव्हे तर राज्यातील तब्बल 99 टक्के भागात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

’99 टक्के भागात दुष्काळ’; पटोलेंची सरसकट कर्जमाफीची मागणी

नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या तुलनेत आधीच दुष्काळ जाहीर करून मदत सुरू केली. महाराष्ट्र सरकारने मात्र निर्णय घेण्यास विलंब केला, असा आरोप त्यांनी केला.

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं न देता तातडीने प्रत्यक्ष मदत मिळणं गरजेचं असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. त्यासाठी तातडीने पंचनामे करावेत, सरसकट कर्जमाफी जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Maharashtra Drought : ‘दुष्काळ जाहीर केला, आता भरीव मदतीचा मुहूर्त कधी?’ हर्षवर्धन सपकाळांची सरकारकडे मोठी मागणी

पावसाअभावी शेतीचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत असल्याचं सांगत सरकारच्या निर्णयाला झालेल्या विलंबामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचा आरोपही पटोलेंनी केला.

ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरूनही पटोलेंचा सवाल

दरम्यान, नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्कार देण्याची मागणी केल्याचा संदर्भ देत पटोलेंनी निवडणूक प्रक्रियेवर सवाल उपस्थित केला.

निवडणूक आयोगातील दोन सहकारी सदस्यांनी विविध मुद्द्यांवर केंद्रीय सचिव आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्रं लिहिल्याचा दावाही पटोले यांनी केला. निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार होत असल्याबाबत या पत्रांमधून लक्ष वेधण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

‘आमचा आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्तांवर’

नाना पटोले यांनी स्पष्ट केलं की, त्यांचा आक्षेप भाजपवर नसून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर आहे. मात्र, भाजपकडून ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनात जोरदार भूमिका घेतली जात असेल तर विविध राज्यांतील निवडणुकांच्या निकालांबाबत प्रश्न निर्माण होतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेचा राजकीय परिणाम झाला का, असा प्रश्नही पटोलेंनी उपस्थित केला.

Maharashtra Drought : ही चक्क शेतकऱ्यांची फसवणूक; दुष्काळाच्या घोषणेतील त्रुटींवर विजय वडेट्टीवार संतापले

‘जनतेच्या मनात भीतीचं वातावरण’

देशातील लोकशाही आणि मतदारांच्या अधिकारांवर परिणाम होत असल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी सरकारवर आणखी टीका केली. त्यांच्या मते, शेतकरी, कामगार, बेरोजगार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रश्न गंभीर होत आहेत.

दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी काँग्रेसकडून सरकारवर दबाव वाढवला जात आहे. आता सरकारकडून नाना पटोलेंच्या मागण्यांवर काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागलं आहे.

Web Title: Nana patole maharashtra drought farmer loan waiver 99 percent area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • Congress
  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • Nana patole

संबंधित बातम्या

Dharashiv News : दिवाळीच्या फराळातून जुळले माणुसकीचे नाते; जिल्हाधिकाऱ्यांची पारधी वस्तीला भेट
1

Dharashiv News : दिवाळीच्या फराळातून जुळले माणुसकीचे नाते; जिल्हाधिकाऱ्यांची पारधी वस्तीला भेट

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
2

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

CM Relief Fund : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी रीजन्सी ग्रुपचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीत ५० लाखांची मदत
3

CM Relief Fund : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी रीजन्सी ग्रुपचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीत ५० लाखांची मदत

Amravati News: भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच! सोयाबीनची आवकही घटली; ४ दिवसांत दरात झाली घसरण
4

Amravati News: भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच! सोयाबीनची आवकही घटली; ४ दिवसांत दरात झाली घसरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.