Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आमच्या गुरूला तू का बोललास…”, शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाही फेक; पिस्तूल दाखवत धमकावल्याचा गंभीर आरोप

Vikas Lawande Shaifek : विकास लवांडे यांच्यावर काही व्यक्तींनी शाईफेक केली असून वारकरी संप्रदाय आणि गोरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या तरुणांनी हा हल्ला केल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 09, 2026 | 01:39 PM
शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाही फेक; पिस्तूल दाखवत धमकावल्याचा गंभीर आरोप

शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाही फेक; पिस्तूल दाखवत धमकावल्याचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:

Vikas Lawande Shaifek News Marathi : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे जे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते असून यांच्यावर शाई फेकत त्यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला. वारकरी संप्रदायातील आणि गोरक्षक तरुणांनी आपल्यावर हा जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे.विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली असून, त्याचबरोबर लवांडे यांच्या अंगावरती शाई ओततानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केली आहे.

विकास लवांडे यांनी सांगितला घटनाक्रम

एका वृत्तवाहिनीला माहिती देताना विकास लवांडे सांगितले की, “आज माझे प्रवचन होणार होते. पुण्याजवळील हवेली तालुक्यात लोणी काळभोरच्या जवळ एका गावामध्ये, माझं आठ वाजता प्रवचन होतं, प्रवचन संपवून मी दहा वाजता बाहेर पडलो. त्याच निर्जन रस्त्यावर एकाच वेळी तीन-चार गाड्या आल्या. त्यांनी गाडी आडवी घातली, मला पकडून गाडीतून खाली उतरवलं, गाडीत संग्राम भंडारी असल्याचे मी ओळखले. उरुळी कांचनमधील अक्षय कांचन नावाचा एक गोरक्षक ओळखायला आला बाकीचे सगळे अनोळखी गुंड प्रवृत्तीचे लोक होते, त्यांनी मला गाडीतून उतरवल्यानंतर धक्काबुक्की करत स्मशानभूमीच्या शेजारी नेलं, तिथेच त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले. कोणताही आवाज करू नकोस वगैरे सांगितले.आमच्या गुरूला तू का बोललास. असंही ते मला बोलले त्यानंतर माझ्या अंगावर एकदम दोन-तीन जणांनी शाईने भरलेल्या बाटल्या ओतायला सुरूवात केली, मला धक्काबुक्की करत शिवीगाळ करत ते निघून गेले, आजूबाजूचे लोक जमायला लागल्यावर ते लोक पळून गेले, तुझा खात्मा करणार, सावध रहा असंही त्यांनी वक्तव्य केलं, असं विकास लवांडे यांनी सांगितलं.

उसाच्या एफआरपीमध्ये केवळ 100 रुपयांची वाढ, शेतकरी संघटना नाराज; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

वारकरी पंथाबद्दल कट्टर आणि जातीय श्रेष्ठत्ववादी विचार असलेले काही लोक आहेत, ज्यांचा प्रत्यक्षात वारकरी परंपरेशी काहीही संबंध नाही. त्यांना कदाचित माझी भूमिका आणि विचार खटकले असावेत. म्हणूनच संग्राम भंडारीने यापूर्वी संगमनेरमध्ये गोंधळ घातला होता. त्यावेळी त्याने आपल्यासोबत गुंडही आणले होते. वारकरी पंथात घुसखोरी करणाऱ्यांबद्दलच्या माझ्या वक्तव्यामुळे तो संतप्त झाला होता आणि मी त्यांच्या गुरूंबद्दल असे का बोललो, असा प्रश्न विचारत होता. यामुळेच माझ्यावर हल्ला झाला असावा. तिथे लोक जमा होऊ लागले, त्यामुळे मी वाचलो. माझा ड्रायव्हरही माझ्यासोबत होता, त्यामुळे माझा जीव वाचला; नाहीतर आज माझा जीव गेला असता,” अशी माहिती विकास लवांडे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, “हल्ला करणाऱ्यांशी माझी कोणतीही ओळख नाही. मी त्यांना ओळखत नाही. सध्या मी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलो आहे आणि पोलीस माझ्या तक्रारीची नोंद घेत आहेत. जोपर्यंत त्या सर्वांना अटक होत नाही, तोपर्यंत मी येथून जाणार नाही. तिथे सुमारे १५ लोक आणि तीन-चार वाहने होती.” हा माझा सत्याग्रह आहे आणि आरोपींना अटक होईपर्यंत तो सुरूच राहील.”

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी आमदार अमोल मिटकरी यांनी या हल्ल्याचा निषेध केला, तर पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी विकास लावण्णे यांना ‘बनावटी वारकरी’ म्हटले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आज सकाळीच कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी विकास लावण्णे यांच्यावर काळी शाई फेकून हल्ला केला होता.

Mumbai News: जे. जे. ला मिळणार ‘ब्रॉन्कोस्कोप’ प्रणाली! इंडियन ऑईलच्या सीएसआर उपक्रमातून दर्जेदार उपचाराची सोय

Web Title: Ncp leader vikas lawande attacked with black ink in pune sangram bhandare and other accused involve he told entire incident maharashtra marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar
  • Vikas Lawande

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा
1

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
2

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Mahavikas Aaghdi Politics: महाविकास आघाडीत नव्या भुकंपाची चाहूल; बैठकीला २३ आमदारांची गैरहजेरी
3

Mahavikas Aaghdi Politics: महाविकास आघाडीत नव्या भुकंपाची चाहूल; बैठकीला २३ आमदारांची गैरहजेरी

Sharad Pawar Faction: महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? उद्धव ठाकरेंसोबतच आता शरद पवारांचे ५ खासदार भाजपच्या संपर्कात!
4

Sharad Pawar Faction: महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? उद्धव ठाकरेंसोबतच आता शरद पवारांचे ५ खासदार भाजपच्या संपर्कात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.