Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : झेडपीत मविआचा ‘करेक्ट कार्यक्रम’; भाजपला झटका; गुढीपाडव्यादिवशी सत्तेची गुढी

लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका-नगरपालिकांमध्ये वरचष्मा राखणाऱ्या भाजपाला सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने जबरदस्त धक्का देत सत्तेपासून दूर ठेवले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 20, 2026 | 06:17 PM
Sangali News : झेडपीत मविआचा ‘करेक्ट कार्यक्रम’; भाजपला झटका; गुढीपाडव्यादिवशी सत्तेची गुढी
Follow Us
Close
Follow Us:
  • झेडपीत मविआचा ‘करेक्ट कार्यक्रम’
  • भाजपला झटका; गुढीपाडव्यादिवशी सत्तेची गुढी
सांगली :  लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका-नगरपालिकांमध्ये वरचष्मा राखणाऱ्या भाजपाला सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने जबरदस्त धक्का देत सत्तेपासून दूर ठेवले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आघाडीने सत्ता स्थापन करत ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या विजयातून आघाडीने एकीचे भक्कम प्रदर्शन घडवत भाजपाला आगामी निवडणुकांसाठी थेट आव्हान दिले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आधीच आघाडीने मजबूत कामगिरी केली होती. जिल्ह्यातील 10 पैकी 9  पंचायत समित्यांवर आघाडीचा झेंडा फडकला, तर भाजपाला केवळ एका समितीवर समाधान मानावे लागले. पंचायत समित्यांतील या यशानंतर जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येणार याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा पण… पालकमंत्र्यांनी नागरिकांना केलं आवाहन

31 हा जादुई आकडा गाठणे होते आवश्यक
जि.प.त कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तासमीकरण गुंतागुंतीचे बनले होते. सत्तेसाठी 31हा जादुई आकडा गाठणे आवश्यक होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 18 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपला 16जागा मिळाल्या, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांचा आघाडीला पाठिंबा होता, तर शिंदे गट, अजित पवार गट तसेच लहान पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत होते, भाजपने सत्ता मिळवण्यासाठी शिंदे गट आणि अजित पवार गटाचा पाठिंबा मिळवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले, संपर्क, दबाव आणि राजकीय हालचालींचा धडाका सुरू होता, मात्र स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि आघाडीच्या नेत्यांची एकजूट यामुळे भाजपचे सर्व प्रयत्न अपुरे ठरले.

  • भाजपचे गणित कसे आणि का बिघडले?
  • स्थानिक पातळीवर अपेक्षित पाठिबा न मिळणे
  • आघाडीतील नेत्यांचा मजबूत समन्वय
  • शेवटच्या क्षणी क्रॉस मूव्हमेंट’ रोखण्यात यश
  • किंगमेकर गटांवर आघाडीची पकड
दिग्गजांची उपस्थिती; जिल्हा परिषदेत ‘पॉवर शो’
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी आघाडीच्या बाजूने खा. विशाल पाटील, डॉ. विश्वजित कदम, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, मनोज शिंदे यांची, तर भाजपच्या बाजूने आ. गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, संजयकाका पाटील, सम्राट महाडिक आदी उपस्थित होते. सभागृहात सदस्य आणि गॅलरीत नेते असा ‘हाय व्होल्टेज’ राजकीय माहोल पाहायला मिळाला.

Kolhapur News : हैराण कोल्हापूरकरांना अवकाळीचा दिलासा; काही भागांत हलक्या सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस

Web Title: On the auspicious occasion of gudi padwa the maha vikas aghadi came to power in sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • navrashtra news
  • political news
  • Sangali News

संबंधित बातम्या

Akola : अकोल्याचा ‘बर्ड मॅन’! चिमण्यांसाठी घरच केलं अभयारण्य
1

Akola : अकोल्याचा ‘बर्ड मॅन’! चिमण्यांसाठी घरच केलं अभयारण्य

Poladpur : स्वच्छ समृद्ध मिशन”साठी गोळेगणी सज्ज; ग्रामस्थांच्या सहभागातून यश
2

Poladpur : स्वच्छ समृद्ध मिशन”साठी गोळेगणी सज्ज; ग्रामस्थांच्या सहभागातून यश

Pune LPG Shortage : गॅसला पारंपारिक पर्याय, कोळशाच्या मदतीने अन्न शिजवण्याची चाकरमान्यांवर वेळ
3

Pune LPG Shortage : गॅसला पारंपारिक पर्याय, कोळशाच्या मदतीने अन्न शिजवण्याची चाकरमान्यांवर वेळ

Pune News : 40 गट एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ता बहुजनांचीच येईल; उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा विश्वास
4

Pune News : 40 गट एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ता बहुजनांचीच येईल; उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.