Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut: “त्यांना वाटतंय मोठा तिर मारलाय, तोच तिर त्यांच्या…” फुटीर खासदारांवर संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut News : शिवसेना UBT मधील कथित पक्षफुटीनंतर संजय राऊत यांनी फुटीर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. मशाल चिन्ह आणि उद्धव ठाकरेंच्या नावावर निवडून आलेले खासदार मतदारांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jun 18, 2026 | 02:52 PM
'लाडकी बहीण योजनेत 3515 कोटी रुपयांचा अपहार,' संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, लवकरच कायदेशीर पावले उचलणार?

'लाडकी बहीण योजनेत 3515 कोटी रुपयांचा अपहार,' संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, लवकरच कायदेशीर पावले उचलणार?

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा माध्यमांशी संवाद
  • खासदार फुटल्याने त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाणार
  • “या लोकांना वाटतंय त्यांनी फार मोठा तिर मारलाय, पण हा तिर त्यांच्याच…,” राऊतांनी केला संताप व्यक्त
Operation Tiger : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दुसऱ्यांदा पक्षपुटी झाली असून शिवसेना शिंदेगटाच्या ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. या पक्षफुटीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीत या सहा खासदारांनी दांडी मारल्यानंतर ठाकरे गटाचे हे सहा खासदार फुटल्याचा स्पष्ट झालं आहे. हे खासदार फुटल्याने आज त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. “आपण मोठा तिर मारला आहे असे जर त्यांना वाटतं असेल तर तोच तिर त्यांच्या ***” अश्या शेलक्या शब्दांत त्यांनी खासदारांवर टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

यावेळी संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला. फुटीर खासदारांवर टीका करत ते म्हणाले, “लोकांनी मतदान भाजपच्या विरोधात केलं. एकनाथ शिंदेच्या विरोधात केलं, लोकांनी मशाल चिन्हाला मतदान केलं. हे सर्व लोक एकनाथ शिंदेंच्या पक्षविरोधात जिंकून आले आहेत. शिर्डीच्या खासदारने दोनवेळा गद्दारी केली. तरीही त्याला तिकीट दिल. काही लोकांना पक्षात घ्यायला माझा विरोध होता. ते पुन्हा पुन्हा बेईमानी करतील, असं मी सांगत होतो. पण, उद्धव ठाकरे दयाळू आहेत. त्यांनी या लोकांना संधी दिली. आता या लोकांना वाटतंय त्यांनी फार मोठा तिर मारलाय, पण हा तिर त्यांच्याच ***” असे म्हणत राऊतांनी आपला संताप व्यक्त केला.

‘ऑपरेशन टायगर’बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना…; बावनकुळे यांचं मोठं विधान

पुढे बोलताना ते म्हणाले, “संजय दिना पाटील आले नाही, ओमराजे पुण्यात आहेत. काल आणि आजही ते आले नाहीत. पण ते दोघेही त्यांच्यासोबत नाहीत.शिंदेगटाने त्यांना किडनॅप केलय का? त्यांच्या जीवाला काही धोका आहे का? हे लोक काहीही करू शकता,” असे ते म्हणाले.

“उद्धव ठाकरे स्वतः माहिती घेत आहेत. चार पाच खासदार म्हणजे पक्ष नाही. त्यांना खासदार बनवणारे कार्यकर्ता म्हणजे पक्ष आहे. आत लोक रस्त्यावर उतरले आहेत. तुमच्या मतदारसंघात जाऊन दाखवाच. तुम्हाला लष्कर घेऊन जावं लागेल. मशाल चिन्हावर तुम्ही निवडून आलात. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर तुम्ही निवडून आलात. मोदी किंवा फडणवीसांच्या चेहऱ्यावर नाही. तुम्ही आमच्याकडून निवडून आलात. बेईमानी करत असाल तर तुम्ही तुमच्या आईच्या दुधाचा लिलाव केला. तुम्ही तुमच्या आईला विकलं,” असे म्हणत त्यांनी फुटीर खासदारांवर घणाघात केला.

Shiv Sena Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला फक्त 3 खासदार उपस्थित; 6 बंडखोरांनी फिरवली पाठ

Web Title: Operation tiger sanjay raut slams rebel mps after shiv sena ubt split

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Operation Tiger
  • sanjay raut
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

NITESH RANE: संजय राऊतांवर नितेश राणेंचा हल्लाबोल; अमित शाहांवर टीका करण्याची ‘लायकी नाही’
1

NITESH RANE: संजय राऊतांवर नितेश राणेंचा हल्लाबोल; अमित शाहांवर टीका करण्याची ‘लायकी नाही’

Sanjay Raut News: २०२९ च्या आधीच राजकीय बाजार उठलेला असेल; भाजपच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांचा पलटवार
2

Sanjay Raut News: २०२९ च्या आधीच राजकीय बाजार उठलेला असेल; भाजपच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांचा पलटवार

‘तुकाराम मुंढे फक्त कायद्याचं पालन…’; नितेश राणेंचं मोठं विधान, संजय राऊतांवरही टीकास्त्र
3

‘तुकाराम मुंढे फक्त कायद्याचं पालन…’; नितेश राणेंचं मोठं विधान, संजय राऊतांवरही टीकास्त्र

Sanjay Raut PC: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले; संजय राऊतांचा घणाघात
4

Sanjay Raut PC: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले; संजय राऊतांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.