Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर, वडेट्टीवारांचे मोठे विधान

पंकजा मुंडे यांच्या भावनिक वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे आणि मुख्यमंत्री होण्याचे खुले आमंत्रण दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 03, 2026 | 02:56 PM
"भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा"; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर

"भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा"; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर

Follow Us
Follow Us:
  • पंकजा मुंडेंना काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर
  • विजय वडेट्टीवार यांचे भाजपवर ओबीसी नेतृत्वाबाबत गंभीर आरोप
  • पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण
 

भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अलीकडेच केलेल्या “राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं” या भावनिक वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसने मोठी राजकीय चाल खेळत पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची खुली ऑफर दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांना थेट आवाहन केले. त्यांनी म्हटले की, गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना अनेकांमध्ये आहे. पंकजा मुंडे यांनाही पक्षात न्याय मिळत नसल्याचे वाटत असेल, तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र नेतृत्व करावे. काँग्रेस त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि नेतृत्वाशी चर्चा करून योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वडेट्टीवार यांनी यावेळी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवरही भाष्य केले. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये सुरू होणाऱ्या मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसी जातनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, महाज्योतीसाठी वाढीव निधी, तसेच ओबीसी समाजातील रिक्त पदांचा बॅकलॉग तातडीने भरावा, अशा मागण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Abhijeet Dipke Challenge To PM Modi: पंतप्रधानांनी आधी पदवी जाहीर करावी; अभिजित दिपकेंचे पंतप्रधानांना थेट आव्हान

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले. खराब रस्त्यावरून प्रवास करताना “आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं,” असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहून नव्याने प्रेरणा मिळाल्याचे सांगत त्यांनी विकासासाठी काम सुरूच ठेवणार असल्याचा संदेशही दिला.

राजकीय विश्लेषकांच्या मते, पंकजा मुंडे या भाजपमधील प्रभावी ओबीसी नेत्या असून त्यांच्या नेतृत्वावर मोठा समर्थक वर्ग विश्वास ठेवतो. अशा परिस्थितीत त्या जर पक्षांतराचा निर्णय घेतला, तर त्याचा राज्याच्या राजकारणावर आणि विशेषतः ओबीसी मतदारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसची ही ऑफर केवळ राजकीय विधान नसून आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची रणनीती मानली जात आहे.

Pappu Yadav Attack : पत्रकार परिषदेत पप्पू यादव यांच्यावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न? ‘माझ्या हत्येचा कट होता’ असा गंभीर आरोप

मात्र, पंकजा मुंडे यांनी अद्याप काँग्रेसच्या ऑफरवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्या या प्रस्तावाकडे कशा प्रकारे पाहतात आणि पुढील काळात कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pankaja munde congress cm offer vijay wadettiwar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Maharashtra Politics
  • Pankaja Munde
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा,  सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी
2

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा, सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
4

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.