Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत

साताऱ्यातील मतदारांची संख्या अधिक असल्याने विजयाचा मार्ग मोठ्या प्रमाणात साताऱ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या मतदानावर अवलंबून राहणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने साताऱ्यातील धैर्यशील कदम यांना उमेदवारी देत महत्त्वाची राजकीय चाल खेळली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 02, 2026 | 08:06 AM
नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम

नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम

Follow Us
Follow Us:

सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदारसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या निवडणुकीत सातारा जिल्हा निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांनी आपले राजकीय लक्ष साताऱ्याकडे केंद्रित केले आहे.

या मतदारसंघात एकूण ८९५ मतदार आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ४७२ तर सांगली जिल्ह्यातील ४२३ मतदारांचा समावेश आहे. साताऱ्यातील मतदारांची संख्या अधिक असल्याने विजयाचा मार्ग मोठ्या प्रमाणात साताऱ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या मतदानावर अवलंबून राहणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने साताऱ्यातील धैर्यशील कदम यांना उमेदवारी देत महत्त्वाची राजकीय चाल खेळली आहे. कदम यांनी सोमवारी सांगली येथे समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक पातळीवरील त्यांचा संपर्क, संघटनात्मक कामकाजातील सहभाग आणि सातारा जिल्ह्यातील प्रभाव लक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे मानले जात आहे.

लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.२५ कोटीहून अधिक महिलांना अपात्र, सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा

महायुतीकडून साताऱ्याला दिलेले प्राधान्य लक्षवेधी ठरत आहे. जिल्ह्यात विविध पक्षांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य असल्याने मतदानाचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे पक्षीय निष्ठेबरोबरच उमेदवाराची प्रतिमा आणि वैयक्तिक संबंध यांचाही निकालावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही सक्षम उमेदवार मैदानात उतरविण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. विरोधकांनी ताकदीचा उमेदवार दिल्यास निवडणूक एकतर्फी न राहता चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत मतांचे विभाजन, अपक्षांची भूमिका आणि संभाव्य क्रॉस व्होटिंग याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व

सांगली-सातारा मतदारसंघातील ही निवडणूक केवळ विधानपरिषदेपुरती मर्यादित राहणार नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही तिच्याकडे महत्त्वाच्या राजकीय चाचणीच्या स्वरूपात पाहिले जात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जानंतर सुरू होणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीत साताऱ्यातील मतदारांचे महत्त्व अधिकच वाढले असून, याच मतांवर विजयाचे अंतिम समीकरण ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Web Title: Path to victory now hinges on the votes from satara dhairyasheel kadam entry adds intrigue to the election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council Election
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
1

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
2

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
3

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
4

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.