Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!’ भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ, जनतेची फसवणूक करत असल्याचा दावा

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अभिजित दिपके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्टंटबाजी करून सोशल मीडियावरून जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 19, 2026 | 10:28 PM
'अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!' भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

'अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!' भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

Follow Us
Follow Us:

दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दीपके यांनी स्वीकारले असून विविध राज्यांतून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही अधिक तापले असून या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. अश्यातच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मोठे वक्तव्य करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून त्यांनी पोस्ट करत दिपकेविरोधात हल्लाबोल केला आहे. “अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!” अश्या शब्दांत त्यांनी अभिजित दिपके आणि जंतर मंतर वरील आंदोलनाला लक्ष्य केले आहे.

‘मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

नेमकं काय म्हणाले प्रसाद लाड ?

प्रसाद लाड म्हणाले, “अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी! लोकशाहीत आंदोलनाला विरोध नाही, परंतु स्टंटबाजीला निश्चितच विरोध आहे. NEET चा विरोध म्हणून आंदोलन उभारलं, सोनम वांगचुक यांना उपोषणाला बसवलं, परंतु स्टंटबाजी करून सोशल मिडिया वापरून जनतेची फसवणूक करणे आता बंद केले पाहिजे…”

अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी! लोकशाहीत आंदोलनाला विरोध नाही, परंतु स्टंटबाजीला निश्चितच विरोध आहे.
NEET चा विरोध म्हणून आंदोलन उभारलं, सोनम वांगचुक यांना उपोषणाला बसवलं, परंतु स्टंटबाजी करून सोशल मिडिया वापरून जनतेची फसवणूक करणे आता बंद केले पाहिजे…… pic.twitter.com/D4WdS4hYqZ
— Prasad Lad (@PrasadLadInd) July 19, 2026

मुंबईतही ठाकरे गटाकडून आंदोलन

दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अन्नत्याग आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत असताना मुंबईतही या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले. आझाद मैदानात झालेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी न करता केंद्रातील सरकार बदलण्याचे आवाहन केले.

या आंदोलनाला आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनस्थळी सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीतील आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी राज्यभरातून नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही करण्यात आले.

CJP चा संसद मार्च रखडणार? दिल्ली पोलिसांच्या ‘त्या’ मोठ्या अपडेटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

CJP चा संसद मार्च रखडणार?

दिल्ली पोलिसांनी २० जुलै २०२६ रोजी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) प्रस्तावित केलेल्या ‘संसद मोर्चा’बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्ली पोलिसांनी अशा कोणत्याही मोर्चा किंवा आंदोलंनासाठी परवानगी दिलेली नाही किंवा अधिकृतपणे मागितलेली नाही. नवी दिल्ली जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेचे (CrPC) कलम १६३ लागू आहे, जे जंतर मंतरच्या निर्धारित क्षेत्राबाहेर कोणत्याही सार्वजनिक मेळाव्याला किंवा मिरवणुकीला प्रतिबंध करते.

Web Title: Prasad lad slams abhijit dipke neet protest sonam wangchuk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:28 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • BJP
  • CJP
  • Prasad Lad
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप
1

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.