सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत! युगेंद्र पवारांकडून उमेदवारांची यादी जाहीर; पाहा संपूर्ण पॅनल
या यादीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्ता चव्हाण, बारामती तालुका पंचायत समितीचे माजी सभापती पोपट पानसरे, राजेंद्रकुमार जगताप यांच्यासह इतर उमेदवारांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पॅनल ‘या पॅनल ची घोषणा करून आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. स्वतः जय पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचा झेंडा घाती घेऊन पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या साथीने स्वतंत्र पॅनल ची घोषणा केली. त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार आहे.
Chakan Traffic: चाकणच्या वाहतूक कोंडीवर PMRDA ची मोठी कारवाई! संथ कामामुळे ठेकेदाराला ७५ लाखांचा दंड
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या नाट्यमय घडामोडी घडल्याने, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीला वेगळे वळण आले आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या शरद पवार व अजित पवार गटात संभाव्य होणारी लढत पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेमुळे आता तिरंगी लढत झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह तालुक्यातील जनतेच्या संपर्कात आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रात सभासदांची व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानुसार त्यांनी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये सभासदांशी संपर्क अभियान सुरू ठेवून उमेदवारांची चाचपणी केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची निवड स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुलाखती घेऊन केली आहे. जय पवार हे देखील स्वतः सुरेंद्र पवार यांच्याबरोबर मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते. एकंदर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची तिरंगी होत असलेली लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्रकुमार जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
निंबुत-खंडाळा गट : दत्ताजीराव रामराव चव्हाण (निरा शिवतक्रार), शंभूराजे सूर्यकांत काकडे (निंबुत), सुभाषराव नामदेव कोळेकर (बावकलवाडी), डॉ. मैत्रेयी शशिकांत काकडे (निंबुत), सोमनाथ कृष्णा मदने (गडदरवाडी).
मुरूम-वाल्हा गट : राजेंद्रकुमार तुकाराम जगताप (वाणेवाडी), प्रवीण शिवाजीराव भोसले (वाणेवाडी), संदीप सदाशिव चव्हाण (मुरूम), सुरेखा बाबुराव गायकवाड (करंजेपूल).
होळ-मोरगाव गट : अनिलकुमार चंदूलाल शहा (वडगाव निंबाळकर), दत्तात्रय भिवा ढोले (मोरगाव), सुनीता शिवाजी कारंडे (होळ), हर्षद अशोक होळकर (सदोबाची वाडी).
कोऱ्हाळे-सुपा गट : सतीश नामदेव खोमणे (कोऱ्हाळे बुद्रुक), पोपट गणपतराव पानसरे (पानसरेवाडी), शिवराज ऊर्फ प्रवीण तानाजी पवार (थोपटेवाडी), गोविंद कृष्णा पवार (कोऱ्हाळे खुर्द).
मांडकी-जवळा-अर्जुन गट : संतोष एकनाथराव जगताप (सासवड), संदीप रामचंद्र देवकर (मावडी सुपे), अंकुश मुरलीधर जगताप (मांडकी).






