Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi on Municipal Election: मतचोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य….;’ महाराष्ट्र निवडणूक आयोगावर राहुल गांधींचा निशाणा

वाद संपवण्यासाठी, आयोगाने म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेडची फक्त पारंपारिक शाई वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वापरली जाणारी शाई आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 16, 2026 | 03:24 PM
Rahul Gandhi on Municipal Election: मतचोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य….;’ महाराष्ट्र निवडणूक आयोगावर राहुल गांधींचा निशाणा
Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीवर  राहुल गांधींचा निशाणा
  • बोटावरील शाई सहजपणे पुसली जात असल्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टिका
  • बोगस मतदार अशा प्रकारे वारंवार बोगस मतदानाची  सर्वाधिक शक्यता
Rahul Gandhi on BMC Election 2026: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणुकांध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांवर भाजप विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. पण या सर्व निकालांवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल करत संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या मतदानादरम्यान बोटावरील शाई सहजपणे पुसून टाकली जात असल्याच व्हिडीओ समोर आला. यावरून राहुल गांधी यांनी याला लोकशाहीची थट्टा असल्याची टिका केली आहे. तर त्याचवेळी निवडणूक आयोगाने मात्र या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशीचे आदेश दिले आहे. (BMC Election 2026) 

Municipal Election Result 2026: शरद पवारांना मोठा हादरा! अनेक शहरांत तुतारी फैल; काकापेक्षा पुतण्या सरस

मत चोरणे हा देशविरोधी कायदा  : राहुल गांधी

महाराष्ट्रातील महारापालिका निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईच्या गुणवत्तेबाबत राज्यभरातील मतदारांकडून प्रश्न उपस्थित केले गेले. हे प्रकरण आता राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटर एक्स वर प्रतिक्रीया देताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग नागरिकांची दिशाभूल करत आहे. लोकशाहीवरील जनतेचा विश्वास उडत चालला आहे. मतचोरणे हा देशविरोधी कायदा आहे.” अशी टिका राहुल गांधी यांनी केली आहे.

संपूर्ण वाद काय आहे?

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका संस्थांसाठी गुरुवारी मतदान झाले. मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मतदान केलेल्या मतदाराच्या बोटावरील शाई एसीटोन किंवा इतर रसायनांनी सहजपणे पुसली जाते, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. यावरून शाई पुसून बोगस मतदार वारंवार मतदान करू शकतात, असा आरोप विरोधकांकडून होऊ लागला. बोगस मतदार अशा प्रकारे वारंवार फसवे मतदान करू शकतात, जर शाई कायमची नसेल तर त्यामुळे फसव्या मतदानाची शक्यता वाढते, जे निवडणूक निष्पक्षतेच्या विरुद्ध आहेय

सरकार आणि निवडणूक आयोगाची भूमिका

पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. शाईवरून होणाऱ्या वादावरून राज्य निवडणूक सुरूवातीला आयोग मागे पडल्याचे दिसून आले. पण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी, आयोगाकडून मार्कर पेनच्या गुणवत्तेची आणि व्हायरल व्हिडिओची सविस्तर चौकशी करेल. व्हिडिओमध्ये दाखवलेली शाई खरी आहे की खोडसाळपणा आहे हे निश्चित केले जाईल. खबरदारी म्हणून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मार्कर पेन वापरला जाणार नाही.” असे जाहीर केले. (Municipal Election Result 2026)

भाजपची राज्यात मोठी ‘लाट’! ९०० हून अधिक जागांवर सर्वात मोठ्या पक्षाची झेप; ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळला

आयोग जुन्या तंत्रज्ञानाकडे परतणार

वाद संपवण्यासाठी, आयोगाने म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेडची फक्त पारंपारिक शाई वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वापरली जाणारी शाई आहे आणि ती पुसणे जवळजवळ अशक्य आहे. आयोग राज्यभरातून मार्कर पेनचे यादृच्छिक नमुने देखील गोळा करेल आणि ते प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पाठवेल.

 

 

Web Title: Rahul gandhi criticizes the election commission over the controversy surrounding the ink mark on voters fingers in the maharashtra municipal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Municipal Election Result 2026: शरद पवारांना मोठा हादरा! अनेक शहरांत तुतारी फैल; काकापेक्षा पुतण्या सरस
1

Municipal Election Result 2026: शरद पवारांना मोठा हादरा! अनेक शहरांत तुतारी फैल; काकापेक्षा पुतण्या सरस

PMC Election Result 2026: पुणेकरांनी मोडली ‘दादागिरी’; अजित पवार झाले ‘फ्री’, पराभवाची कारणे काय?
2

PMC Election Result 2026: पुणेकरांनी मोडली ‘दादागिरी’; अजित पवार झाले ‘फ्री’, पराभवाची कारणे काय?

Sanjay Shirsat: मतमोजणी बाहेर शिवसेना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज , मंत्री शिरसाट यांची पोलिसांवर जोरदार टीका
3

Sanjay Shirsat: मतमोजणी बाहेर शिवसेना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज , मंत्री शिरसाट यांची पोलिसांवर जोरदार टीका

BMC Elections 2026 : मुंबईत सर्वात धक्कादायक विजय! BMC मध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी, ठाकरे बंधूंना धक्का
4

BMC Elections 2026 : मुंबईत सर्वात धक्कादायक विजय! BMC मध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी, ठाकरे बंधूंना धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.