भाजपची राज्यात मोठी ‘लाट’! ९०० हून अधिक जागांवर सर्वात मोठ्या पक्षाची झेप (Photo Credit- X)
राज्यातील २९ महापालिकांच्या मतमोजणीत भाजपने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने भाजपने अनेक शहरांत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.
सर्वात मोठा उलटफेर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत पाहायला मिळत आहे. दशकानुदशके शिवसेनेचा गड राहिलेल्या या शहरात यावेळी भाजपने सुरुंग लावला आहे. भाजपचे उमेदवार सध्या २३ जागांवर आघाडीवर असून त्यांनी महापौरपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
संभाजीनगरमधील धक्कादायक आकडेवारी:
भाजप: ३५ जागा (आघाडी)
MIM: १६ जागा (आघाडी)
शिवसेना (शिंदे गट): १५ जागा (आघाडी)
शिवसेना (ठाकरे गट): ०८ जागा (आघाडी)
वंचित बहुजन आघाडी: ०४ जागा (आघाडी)
काँग्रेस: ०३ जागा (आघाडी)
कोल्हापुरात 81 पैकी 28 जागांचे निकाल जाहीर; काँग्रेसची आघाडी तर भाजप…
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे ताकदवान नेते आणि मंत्री संजय शिरसाट तसेच खासदार संदीपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, मतदारांनी दिलेला कौल पाहता या नेत्यांना मोठा झटका बसला आहे. दुसरीकडे, असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने (MIM) १५ जागांवर आघाडी घेत मोठी मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा निकाल अत्यंत क्लेशदायक ठरला असून, त्यांनी आपला हा महत्त्वाचा बालेकिल्ला गमावला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने ४ जागा मिळवत किंगमेकरच्या भूमिकेत येण्याचे संकेत दिले आहेत.
केवळ संभाजीनगरच नव्हे, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने आपली सत्ता कायम राखल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेतही (BMC) भाजप आणि ठाकरे गटात अटीतटीची लढत सुरू असून, तिथेही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील या निकालांनी आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी दिली असून, विरोधकांसाठी हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे.
पालकमंत्र्याची मुलं असल्यामुळे आमच्या विरोधात नाही ते आरोप करण्यात आले. आमच्यावरती आरोप केले मात्र आमच्या सोबत शिवसैनिक आहेत. शिवसैनिकांनी मनाने काम केलं आणि हा विजय त्यांचा विजय आहे. महानगरपालिकेत गेल्यानंतर असं काम करायचं की पुढच्या पाच वर्षानंतर आम्हाला लोकांकडे जायची गरज पडली नाही पाहिजे. महापौर पदाचा आणखीन आरक्षण निघालेलं नाहीये त्यावर मी भाष्य करू शकत नाही. जी काही घडामोड होईल ती पुढे होईल जेव्हा महापौर पदाचे आरक्षण निघेल.






