Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punha Shivajiraje Bhosale : ‘हे मराठी माणसाला दिसत नाहीये का? मांजरेकरांच्या चित्रपटासाठी राज ठाकरेंची खास पोस्ट

Raj Thackeray on Punha Shivajiraje Bhosale : दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या नव्या सिनेमाबद्दल मनसे नेते राज ठाकरेंनी खास पोस्ट केली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 02, 2025 | 12:20 PM
Raj Thackeray post on Mahesh Manjrekar new movie Punha Shivaji Raje Bhosale

Raj Thackeray post on Mahesh Manjrekar new movie Punha Shivaji Raje Bhosale

Follow Us
Close
Follow Us:

Raj Thackeray on Punha Shivajiraje Bhosale : मुंबई : मराठी सिनेविश्वामध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. नुकताच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी 2009 साली मांजेकरांच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता नवीन चित्रपट देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील पाहिला. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन चित्रपटाचा अभिप्राय लिहिला आहे. याचबरोबर महेश मांजरेकर यांचे कौतुक करत मराठी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबाबत लिहिले आहे. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, “मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला… समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही… पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाला पर्याय नाही…”

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

“आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे ‘विकास’ अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे.” असे टीकास्त्र राज ठाकरेंनी डागले.

मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला… समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही… पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर ‘पुन्हा शिवाजीराजे… pic.twitter.com/Xum0x5Gfxz — Raj Thackeray (@RajThackeray) November 2, 2025

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे.”

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

“हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही… पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट जरूर पहा…” अशा शब्दांत मनसे नेते राज ठाकरे यांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचे कौतुक केले आहे.तसेच मराठी लोकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन देखील केले.

Web Title: Raj thackeray post on mahesh manjrekar new movie punha shivaji raje bhosale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • mahesh manjrekar
  • marathi movie
  • raj thackeray

संबंधित बातम्या

प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह
1

प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह

‘उत्तर’मधील ‘नन्या’ने जिंकली प्रेक्षकांची मने! अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र होतंय कौतुक
2

‘उत्तर’मधील ‘नन्या’ने जिंकली प्रेक्षकांची मने! अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र होतंय कौतुक

‘मराठी माणसालाच मराठी भाषेची लाज वाटते…’ अंगावर शहारा आणणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चा ट्रेलर
3

‘मराठी माणसालाच मराठी भाषेची लाज वाटते…’ अंगावर शहारा आणणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चा ट्रेलर

Thackeray Brothers alliance : ज्या घोषणेची उत्सुकता ती लवकरच…! ठाकरे बंधूंची चर्चा अंतिम टप्प्यात, उत्सुकता पोहचली शिगेला
4

Thackeray Brothers alliance : ज्या घोषणेची उत्सुकता ती लवकरच…! ठाकरे बंधूंची चर्चा अंतिम टप्प्यात, उत्सुकता पोहचली शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.