इराण इस्रायल युद्धाचा परिणामी महाराष्ट्रातील गॅस तुटवडा यावर सीएम देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यामध्ये इराण – इस्रायल युद्धाच्या परिणामांवर भाष्य केले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन-तीन दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं की, पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार, विनाकारण मोठ्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या. भारत सरकारने सांगितलं की, अशी कुठलीही कमतरता होणार नाही. त्यामुळे भविष्यात जी परिस्थिती उद्भवेल याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजींच्या नेतृत्वात सक्षमपणे भक्कम परिस्थितीत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : इराण–इस्त्रायल युद्धाचे महाराष्ट्रात पडसाद! कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्याने हॉटेल व्यवसाय संकटात
घरगुती गॅसच्या किमत वाढल्यामुळे महिलांचे घरगुती बजेट कोलमडले आहे. पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. महिलांचे म्हणणे आहे की, गॅसचे दर वाढत आहेत, तेलाचे दर वाढत आहेत, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. मात्र आमचे पगार काही वाढत नाहीत, अशी तक्रारही महिलांनी केली आहे.
हे देखील वाचा : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन
हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस एजन्सीकडून पुरेशा प्रमाणात कमर्शियल सिलेंडर मिळत नाहीत. काही ठिकाणी सिलेंडर मिळण्यास विलंब होत आहे, तर अनेक विक्रेते “शासन निर्देश असल्याने कमर्शियल सिलेंडर देऊ शकत नाही” असे सांगत आहेत. परिणामी काही हॉटेल मालकांना बाजारातून जादा दराने सिलेंडर घ्यावे लागत असून व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पर्यटन हंगामात सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होतात. विशेषतः महाबळेश्वर व पाचगणी परिसरात हॉटेल आणि रेस्टॉरंटची मोठी संख्या आहे. मात्र सिलेंडर टंचाईमुळे अनेक हॉटेल्सना नाश्ता आणि जेवणाच्या सेवा मर्यादित कराव्या लागल्या असून काही ठिकाणी स्वयंपाकघर तात्पुरते बंद करण्याची वेळ आली आहे.






